Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स
कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी 249 आणि 250 रुपये असे दोन प्लॅन्स लाँच केले आहेत. हे प्लॅन्स विशेषत: अशा लोकांसाठी सुरु करण्यात आले आहेत, ज्यांना कमी खर्चात त्यांचे सिम सुरु ठेवायचे आहे. खरं तर सध्या टेलिकॉम कंपन्या एका डेटा लिमिटसह रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. ही डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सना पुन्हा इंटरनेटचा वापर करण्यासाठी दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट पाहावी लागते किंवा एखादा ॲड ऑन पॅक खरेदी करावा लागतो. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन आता वोडाफोन-आयडियाने एक नवीन प्रयत्न केला आहे. यूजर्स नंबर रिचार्ज केल्यानंतर डेली डेटा एकत्र वापरू शकतात ज्यामुळे त्यांना कोणत्याही डेटा लिमिटची भिती असणार नाही. किंवा यूजर्स त्यांच्या मर्जीनुसार डेटा लिमिट सेट करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
वोडाफोन-आयडिया त्यांच्या नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 0.5GB या हिशोबाने एकूण 14GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनची विशेषत: म्हणजेच, यूजर्स त्यांच्या हिशोबाने प्लॅनची डेटा लिमिट सेट करू शकणार आहेत. तसेच, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार आहे. यासोबतच रोज 100 मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळणार आहे. हा प्लॅन विशेषत: अशा यूजर्ससाठी सादर करण्यात आला आहे, ज्यांना कमी खर्चात त्यांचा नंबर सुरु ठेवायचा आहे.
पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स
हा प्लॅन देखील यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात मोफत नॅशनल रोमिंग आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सना 2GB डेटा देखील ऑफर करत आहे. यासोबतच, 28 दिवसांसाठी स्पॉटिफाय प्रिमियम देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्स त्यांच्या मर्जीने डेटा लिमिट सेट करू शकणार नाहीत.






