BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीचा नवा प्लॅन! 1 महिन्याची व्हॅलिडिटी अन् डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे, किंमत केवळ इतकी
Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत
बीएसएनएल त्यांच्या यूजर्सना 299 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांची म्हणजेच संपूर्ण महिन्यााची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 3GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. म्हणजेच व्हॅलिडीटी पूर्ण होईपर्यंत यूजर्सना एकूण 90GB डेटा मिळणार आहे. ज्यांना गेमिंग, स्ट्रिमिंग किंवा व्हिडीओ पाहायला आवडतात, अशा यूजर्ससाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. 3GB डेटा लिमिट पूर्ण झााली, तरी इंटरनेट बंद होणार नाही. लिमिट संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होऊन 40 Kbps होणार आहे. यामुळे तुम्ही महत्त्वाचे मेसेज पाठवू शकता आणि ब्राऊझिंग देखील करू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
Your everyday deserves more. Recharge with the BSNL ₹299 Plan and keep your day moving without missing a moment.#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #EverydayConnectivity #299plan @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/PCT1jw5uZ0 — BSNL India (@BSNLCorporate) August 3, 2026
केवळ इंटरनेट डेटाच नाही तर या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच, यूजर्सना रोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. ज्या यूजर्सना जास्तीचा इंटरनेट आवश्यक असतो आणि कॉलिंगची गरज असते अशा लोकांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार आहे.
कोणताही बीएसएनएल रिचार्ज करण्यापूर्वी तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रात बीएसएनएलची नेटवर्क उपलब्धता आणि इंटरनेट स्पीड तपासून घ्या. जर तुमच्या क्षेत्रात बीएसएनएलचे नेटवर्क कनेक्शन योग्य पद्धतीने काम करत असेल तर 299 रुपयांचा हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण हा प्लॅन यूजर्सना कमी किंमतीत रोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. हा एक बजेट फ्रेंडली किंमतीत उपलब्ध असणारा रिचार्ज प्लॅन आहे.






