Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership... वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन
OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका
चांगली गोष्ट म्हणजे, ‘प्राइम’चे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ग्राहक कोणत्याही एकाच प्लॅनशी बांधले जाणार नाहीत. त्यांना हवे असल्यास, ते जिओच्या इतर प्लॅन्सद्वारे रिचार्ज करू शकतात आणि तरीही ‘प्राइम’ सदस्यत्वाचे फायदे मिळवू शकतात. जिओने स्पष्ट केले आहे की, त्यांचा सध्याचा 299 रुपयांचा प्लॅन सुरूच राहील.
जिओ प्राईम मेंबरशिपची किंमत कंपनीने 300 रुपये ठेवली आहे. ही मेंबरशिप एकदा पेमेंट केल्यानंतर क्लेम केली जाऊ शकते. ही सुविधा सध्याच्या प्रीपेड आणि पोस्टपेड जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तसेच जर तुम्ही दुसऱ्या टेलिकॉम कंपनीचे सिम वापरत असाल तर तुम्ही जिओ नंबरमध्ये पोर्ट करून प्राईम मेंबरशिप खरेदी करू शकता. कंपनीचं असं म्हणणं आहे की, मेंबरशिप खरेदी करणारे ग्राहक 5 सप्टेंबर 2027 पर्यंत त्यांचे सध्याचे जिओ प्लॅन आज उपलब्ध असणाऱ्या किंमतीत रिचार्ज करू शकतात. भविष्यात जरी दर वाढले, तरी त्यांच्या सध्याच्या प्लॅनची किंमत कायम राहील. (फोटो सौजन्य: Pinterest)
इतकंच नाही तर जिओ प्राईम मेंबरशिपसह ग्राहकांना एकूण 600 रुपये किमतीचे दोन कॅशबॅक वाऊचर दिले जाणार आहे. यामध्ये 300 रुपयांचे जिओहोम किंवा जिओ पीसी कनेक्शनचे वाऊचर असणार आहे. तसेच दुसरे 300 रुपयांचे व्हाउचर कुटुंबातील सदस्य किंवा मित्रासाठी नवीन जिओ सिम घेण्यासाठी वापरता येईल. तसेच, यूजर्सना जिओची नवीन प्रोडक्ट्स आणि सेवांचा लाभ इतरांच्या आधी घेता येईल.
Pixel 11 VS iPhone 17: कोण आहे खरा किंग? कॅमेऱ्यापासून किंमतीपर्यंत… खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना
प्राईम मेंबर्सना कंपनी प्रायोरिटी कस्टमर सपोर्ट ऑफर करणार आहे. यासाठी वेगळा सर्विस चॅनेल देखील उपलब्ध केला जाणार आहे. याशिवाय, मेंबर्सना नवीन जिओ प्रोडक्ट्स, सर्विस आणि ट्रायल्सचा ॲक्सेस सर्वात आधी मिळणार आहे. जिओ प्राईम मेंबर्सना वेळोवेळी एक्स्ट्रा एक्सक्लूसिव बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. तुम्ही मायजिओ ॲप, Jio.com, जिओ स्टोअर्स आणि अधिकृत जिओ पार्टनर स्टोअर्सवरून जिओ प्राईम मेंबरशिप मिळवू शकता.






