Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

Jio Prime Membership: आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली जिओ त्यांच्या यूजर्ससाठी पुन्हा एकदा जिओ प्राईम मेंबरशिप घेऊन आली आहे. ही मेंबरशिप खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1 वर्षासाठी त्यांच्या सध्याच्या रिचार्ज प्लॅनची किंमत लॉक करण्याचा पर्याय मिळणार आहे. याचा फायदा कसा होणार, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2026 | 11:19 AM
Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership... वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership... वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

Follow Us
Follow Us:
  • ₹300 ची जिओ प्राईम मेंबरशिप घेतल्यानंतर ग्राहकांना 5 सप्टेंबर 2027 पर्यंत सध्याच्या प्लॅनच्या किंमतीत रिचार्ज करता येणार आहे.
  • मेंबरशिपसोबत ग्राहकांना एकूण ₹600 पर्यंतचे जिओहोम, जिओपीसी आणि नवीन जिओ सिम कनेक्शनसाठी कॅशबॅक वाउचर मिळणार आहेत.
  • प्राईम मेंबरशिपना प्रायोरिटी कस्टमर सपोर्ट तसेच नवीन जिओ प्रोडक्ट्स, सर्विसेस आणि ट्रायल्सचा अर्ली अ‍ॅक्सेस मिळणार आहे.
रिलायंस जियोने भारतात पुन्हा एकदा जिओ प्राईम मेंबरशिप लाँच केली आहे. या मेंबरशिपची सर्वात मोठी खासियत अशी आहे की, जिओ यूजर्स आता त्यांच्या सध्याच्या प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅनची किंमत एका वर्षासाठी लॉक केली जाऊ शकते. सोप्या शब्दांत बोलायचं झालं तर, जर कंपनी येणाऱ्या काळात त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवू शकते. पण जर तुम्ही प्राईम मेंबर्स असाल तर सध्याचे प्लॅन तुम्ही जुन्या किंमतीत खरेदी करू शकता.

OnePlus स्मार्टफोन्स महागले! तब्बल 4 हजार रुपयांनी वाढली किंमत, ग्राहकांना बसणार महागाईचा फटका

चांगली गोष्ट म्हणजे, ‘प्राइम’चे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर ग्राहक कोणत्याही एकाच प्लॅनशी बांधले जाणार नाहीत. त्यांना हवे असल्यास, ते जिओच्या इतर प्लॅन्सद्वारे रिचार्ज करू शकतात आणि तरीही ‘प्राइम’ सदस्यत्वाचे फायदे मिळवू शकतात. जिओने स्पष्ट केले आहे की, त्यांचा सध्याचा 299 रुपयांचा प्लॅन सुरूच राहील.

जिओ प्राईम मेंबरशिपची किंमत

जिओ प्राईम मेंबरशिपची किंमत कंपनीने 300 रुपये ठेवली आहे. ही मेंबरशिप एकदा पेमेंट केल्यानंतर क्लेम केली जाऊ शकते. ही सुविधा सध्याच्या प्रीपेड आणि पोस्टपेड जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तसेच जर तुम्ही दुसऱ्या टेलिकॉम कंपनीचे सिम वापरत असाल तर तुम्ही जिओ नंबरमध्ये पोर्ट करून प्राईम मेंबरशिप खरेदी करू शकता. कंपनीचं असं म्हणणं आहे की, मेंबरशिप खरेदी करणारे ग्राहक 5 सप्टेंबर 2027 पर्यंत त्यांचे सध्याचे जिओ प्लॅन आज उपलब्ध असणाऱ्या किंमतीत रिचार्ज करू शकतात. भविष्यात जरी दर वाढले, तरी त्यांच्या सध्याच्या प्लॅनची ​​किंमत कायम राहील.  (फोटो सौजन्य: Pinterest)

600 रुपयांपर्यंत कॅशबॅक वाउचर

इतकंच नाही तर जिओ प्राईम मेंबरशिपसह ग्राहकांना एकूण 600 रुपये किमतीचे दोन कॅशबॅक वाऊचर दिले जाणार आहे. यामध्ये 300 रुपयांचे जिओहोम किंवा जिओ पीसी कनेक्शनचे वाऊचर असणार आहे. तसेच दुसरे 300 रुपयांचे व्हाउचर कुटुंबातील सदस्य किंवा मित्रासाठी नवीन जिओ सिम घेण्यासाठी वापरता येईल. तसेच, यूजर्सना जिओची नवीन प्रोडक्ट्स आणि सेवांचा लाभ इतरांच्या आधी घेता येईल.

Pixel 11 VS iPhone 17: कोण आहे खरा किंग? कॅमेऱ्यापासून किंमतीपर्यंत… खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

प्राईम मेंबर्सना मिळणार हे एक्सक्लूसिव बेनिफिट्स

प्राईम मेंबर्सना कंपनी प्रायोरिटी कस्टमर सपोर्ट ऑफर करणार आहे. यासाठी वेगळा सर्विस चॅनेल देखील उपलब्ध केला जाणार आहे. याशिवाय, मेंबर्सना नवीन जिओ प्रोडक्ट्स, सर्विस आणि ट्रायल्सचा ॲक्सेस सर्वात आधी मिळणार आहे. जिओ प्राईम मेंबर्सना वेळोवेळी एक्स्ट्रा एक्सक्लूसिव बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. तुम्ही मायजिओ ॲप, Jio.com, जिओ स्टोअर्स आणि अधिकृत जिओ पार्टनर स्टोअर्सवरून जिओ प्राईम मेंबरशिप मिळवू शकता.

Web Title: Jio prime membership relaunched at rs 300 lock recharge price get rs 600 cashback benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • jio
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे
1

Jio Recharge Plan: 189 रुपये की 199 रुपये? कोणता जिओ रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर? जाणून घ्या डेटा आणि इतर फायदे

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
2

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
3

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
4

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.