
Jio Recharge Plan: 28 नाही, 30 नाही तर थेट 36 दिवसांची व्हॅलिडीटी! जिओच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार भरपूर फायदे, जाणून घ्या
जिओ रिचार्ज प्लॅनची किंमत 450 रुपये आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 36 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 72GB डेटा मिळणार आहे. रोज मिळणारा हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होऊन 64Kbps होणार आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोज 100 एसएमएस देखील मिळणार आहे. एलिजिबल यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळू शकतो. (फोटो सौजन्य: Pinterest)
प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटासह जिओहॉटस्टारचा मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळणार आहे. यासोबतच, प्लॅनमध्ये जिओटिव्ही आणि जिओएआयक्लाऊडची सुविधा देखील मिळणार आहे. याशिवाय, जिओएआयक्लाऊडवर ग्राहकांना 50GB फ्री क्लाऊड स्टोरेज मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ आणि इतर फाइल्स ऑनलाइन साठवू शकता.
प्लॅनमध्ये गुगल जेमिनीचे 18 महिन्यांचे प्रो सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे, ज्याची किंमत 35,100 रुपये आहे. यामध्ये 5,000GB क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना सारखे एआय बेनिफिट्स देखील मिळणार आहे. प्लॅनमध्ये 12 महिन्यांचे कॅन्व्हा प्रो लाईट सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 1,590 रुपये आहे. पात्र ग्राहकांना गुगल जेमिनी आणि कॅनव्हा शी संबंधित अतिरिक्त लाभही मिळू शकतात.
Ans: जिओच्या या ₹450 रिचार्ज प्लॅनमध्ये 36 दिवसांची वैधता मिळते.
Ans: या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. संपूर्ण 36 दिवसांच्या वैधतेत एकूण 72GB डेटा वापरता येतो.
Ans: होय. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळते.