Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

JioHotstar Updates: जिओहॉटस्टारने मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात विस्तार करण्याची घोषणा केली आहे. जिओहॉटस्टार STARZPLAY ॲप आणि वेबसाइटमध्ये एक समर्पित स्ट्रीमिंग गंतव्य म्हणून उपलब्ध असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 09, 2026 | 10:06 AM
JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Follow Us
Follow Us:
  • मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात होणार जिओहॉटस्टारचा विस्तार
  • जिओहॉटस्टार STARZPLAY ॲप आणि वेबसाइटमध्ये एक समर्पित स्ट्रीमिंग गंतव्य म्हणून उपलब्ध
  • STARZPLAY वरील जिओहॉटस्टार प्लॅनची किंमत जाहीर
JioHotstar: भारतातील लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या जिओहॉटस्टारने मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशात देखील आता विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आता अधिकृतपणे घोषणा देखील करण्यात आली आहे. कंपनीच्या वेगाने वाढणाऱ्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीतील ही नवीन झेप आहे. यूके, कॅनडा आणि सिंगापूरमधील लाँचला यूजर्सचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला. MENA (मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका) प्रदेशातील हा प्रवेश जिओहॉटस्टारच्या जागतिक उपस्थितीला दक्षिण आशियाई प्रेक्षकांसाठी जगातील अत्यंत महत्त्वाच्या अशा एका प्रदेशाशी जोडतो.

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स

STARZPLAY सोबत कंपनीने केली भागिदारी

STARZPLAY सोबत करण्यात आलेल्या विशेष भागीदारीनंतर, जिओहॉटस्टार STARZPLAY ॲप आणि वेबसाइटमध्ये एक समर्पित स्ट्रीमिंग गंतव्य म्हणून उपलब्ध असणार आहे. ही भागीदारी जिओहॉटस्टारची व्यापक पोहोच आणि विविधता, तसेच STARZPLAY ची प्रादेशिक उपस्थिती, प्रेक्षकांविषयीची समज आणि स्ट्रीमिंग क्षेत्रातील कौशल्य यांचा मेळ घालते.

प्रेक्षकांना मिळणार नवीन जिओहॉटस्टार ओरिजिनल्स पाहण्याचा आनंद

MENA प्रदेशातील प्रेक्षक आता भारतातील प्रदर्शनासोबतच नवीन जिओहॉटस्टार ओरिजिनल्सची देखील मजा घेऊ शकणार आहेत. यामध्ये 10 पर्यंत भाषांमधील ऑडिओ ट्रॅक्सचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त, प्रेक्षक जिओस्टार टीव्ही चॅनेल्सवर लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम, ब्लॉकबस्टर चित्रपट आणि देशातील काही सर्वात मोठ्या रिअ‍ॅलिटी शो फ्रँचायझींचा आनंद घेऊ शकतील. यामध्ये कॉफी विथ करणचा आगामी सीझन, बिग बॉसचा समावेश आहे, जे सहा भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलगू, बंगाली आणि इतर भाषांमधील मजकूर समाविष्ट आहे. तसेच, यात मल्याळम भाषेतील मजकुराचा मोठा संग्रह उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे, जे या प्रदेशातील मल्याळी प्रेक्षकांचे महत्त्व अधोरेखित करते.

जिओहॉटस्टार प्लॅनची किंमत

STARZPLAY च्या प्लस प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारच्या मंथली प्लॅनची किंमत AED 34.99 आहे. मॅक्स प्लॅनची किंमत AED 49.99 प्रति महिना आहे. यामध्ये ग्राहकांना संपूर्ण मनोरंजन ऑफर आणि STARZPLAY चे क्रीडा पोर्टफोलिओचा एकत्र आनंद घेता येणार आहे. मॅक्स प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे दैनंदिन मनोरंजन, ओरिजिनल्स, रिॲलिटी फ्रँचायझी आणि चित्रपट यांचा समावेश असणार आहे.

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

जिओहॉटस्टारच्या मध्य पूर्वेतील विस्ताराबाबत जिओस्टारचे हेड – इंटरनॅशनल बिझनेस, अमित मल्होत्रा म्हणाले की, यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये जिओहॉटस्टारला दमदार प्रतिसाद मिळाला. यामुळेच भारतीय मनोरंजनासाठी असलेल्या जागतिक संधीवरचा आमचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. भारतीय कथा, प्रतिभा आणि सांस्कृतिक क्षण जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशातील विस्तार हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Web Title: Jiohotstar expands to middle east and north africa check subscription plans prices and available shows hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • JioHotstar
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स
1

Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा झाला खराब? ब्लर फोटोंनी झालात हैराण? सर्विस सेंटरला जाण्यापूर्वी वापरा ‘या’ टिप्स

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
2

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
3

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
4

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.