Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

आता प्रत्येक AI ला संपूर्ण ज्ञान पहिल्यापासून सांगण्याची गरज नाही. कारण भारतात Kemory लाँच करण्यात आले आहे. Kemory ही एक स्वतंत्र, वापरकर्त्याच्या परवानगीवर आधारित AI मेमरी लेयर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2026 | 02:12 PM
AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Follow Us
Follow Us:
  • Kemory ही कोणत्याही एका AI मॉडेलवर अवलंबून नसलेली स्वतंत्र आणि परवानगीवर आधारित AI मेमरी लेयर आहे.
  • कंपनीच्या माहितीनुसार, Kemoryने लाँग मोरल-एस ओरॅकल बेंचमार्क वर 89.6% अचूकता मिळवली आहे.
  • भारतातील वापरकर्त्यांसाठी डेटा भारतातील सर्व्हरवर साठवला जात असून, सार्वजनिक बीटामध्ये 2,000 पर्यंत मेमरीज आणि चॅट्स मोफत मिळणार आहेत.
सध्याच्या काळात AI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध कामांसाठी विविध AI टूल्सचा वापर केला जातो. विविध AI टूल्सचा वापर करताना एक गोष्ट वारंवार जाणवते की, नवीन AI टूल वापरलं की पुन्हा आपली माहिती सांगावी लागते, आधीचे संदर्भ समजावून द्यावे लागतात आणि अनेकदा आधी तयार केलेलं ज्ञान पुन्हा सुरुवातीपासून शेअर करावं लागतं. त्यामुळे यूजर्सना वैताग येतो. यूजर्सची हीच अडचण सोडवण्याच्या उद्देशाने SeKondBrainने भारतात Kemoryची सार्वजनिक बीटा आवृत्ती लाँच केली आहे. Kemory ही एक स्वतंत्र, वापरकर्त्याच्या परवानगीवर आधारित AI मेमरी लेयर आहे. म्हणजेच, तुम्ही कोणतंही AI मॉडेल किंवा असिस्टंट वापरत असलात, तरी तुमचा संदर्भ आणि ज्ञान तुमच्यासोबत राहू शकतं.

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान

तुमचं ज्ञान, तुमच्यासोबत

आजच्या डिजीटल काळात यूजर्स केवळ एका AI पुरते मर्यादित राहिलेले नाही. कामानुसार वेगवेगळी AI टूल्स आणि असिस्टंट्स वापरणं ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र प्रत्येक नवीन टूलला पुन्हा “मी कोण आहे”, “माझं काम काय आहे” किंवा “याआधी आपण काय बोललो होतो” हे समजावून सांगणं वेळखाऊ ठरू शकतं. Kemory याच ठिकाणी काम करते. ती कोणत्याही एका AI मॉडेलवर अवलंबून नसल्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचं ज्ञान एका ठिकाणी जतन करून ठेवता येतं आणि गरजेनुसार वेगवेगळ्या AI टूल्सना त्यासाठी परवानगी देता येते.

“Kemoryसाठी भारत ही नंतरची बाजारपेठ नाही; भारत हाच बाजार आहे. जेव्हा वापरकर्त्यांकडे त्यांचं स्वतःचं ज्ञान असतं आणि ते ज्ञान ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात, तेव्हा प्रत्येक AI मॉडेलला शून्यापासून सुरुवात करावी लागत नाही. ते आधीपासून उपलब्ध असलेल्या संदर्भापासून पुढे काम करू शकतं,” असं सचिन देव दुग्गल, संस्थापक आणि सीईओ, सिकॉडब्रेन यांनी सांगितलं.

AI मॉडेलपेक्षा वेगळी ‘मेमरी लेयर’

सिकॉडब्रेनच्या मते, Kemoryचा मुख्य भर तीन गोष्टींवर आहे. ज्यामध्ये ज्ञानाची मालकी, परवानगीवर आधारित प्रवेश आणि AI मॉडेल्सपासून स्वतंत्र राहण्याची क्षमता यांचा समावेश आहे. कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार, सार्वजनिक लाँगमेमइव्हॅल -एसच ओरॅकल बेंचमार्क वर Kemoryने 89.6% अचूकता मिळवली. म्हणजेच 500 पैकी 448 प्रश्नांची अचूक उत्तरं देण्यात आली. हा निकाल केवळ मेमरीमधून योग्य माहिती शोधण्याची क्षमता मोजत नाही, तर माहिती शोधणे, उत्तर तयार करणे आणि त्या उत्तराचं मूल्यांकन करणे या संपूर्ण प्रक्रियेतील कामगिरी दर्शवतो.

भारतातील वापरकर्त्यांसाठी डेटा भारतातच

Kemoryची निर्मिती “फॉर इंडिया, फ्रॉम इंडिया” या विचारातून करण्यात आली आहे. भारतीय वापरकर्त्यांचा डेटा भारतातील सर्व्हरवर साठवला जातो, असं कंपनीने सांगितलं आहे. सार्वजनिक बीटा आवृत्तीमध्ये वापरकर्त्यांना क्रोमसाठी कोरा, दोन कनेक्टेड एआय, 2,000 पर्यंत ममोरीज आणि चॅट्स आणि फेअर यूज क्रेडिट्स मोफत मिळणार आहेत. Kemoryची सार्वजनिक बीटा आवृत्ती आता भारतातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

सिकॉडब्रेन बद्दल:

सिकॉडब्रेन AI, माणसं आणि ज्ञानाच्या टीम्ससाठी एक शेअर्ड इंटेलिजन्स लेअर विकसित करत आहे. कंपनीचं न्यूरोसिम्बॉलिक मेमरी आणि रीझनिंग लेयर हे AI मॉडेल्सच्या वर आणि वापरकर्ते किंवा संस्था वापरत असलेल्या एजेंट्ल आणि टूल्सच्या खाली काम करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. यामागची कल्पना साधी आहे की, प्रत्येक नवीन संभाषणात AIने पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्याऐवजी, आधीपासून तयार झालेल्या संदर्भ आणि ज्ञानाच्या आधारावर पुढे काम करावं.

काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा

Kemory ही सिकॉडब्रेनच्या भविष्यातील शेअर्ड मेमरी इंफ्रास्ट्रक्चरमधील पहिली लेअर आहे आणि कंपनीने तिची सुरुवात ममरीपासून केली आहे. माहितीच्या वाढत्या प्रमाणामुळे निर्माण होणारी गुंतागुंत कमी करून जगभरातील विचार करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या ज्ञानाचा अधिक चांगला वापर करता यावा, हे कंपनीचं व्यापक ध्येय आहे. सिकॉडब्रेन कॉग्निटिवो नावाच्या फ्लॅट टीम स्ट्रक्चर मध्ये काम करते. या पद्धतीमध्ये स्पेशालिस्ट सायलोझ किंवा केवळ मॅनेजमेंट रोल्सवर भर न देता, प्रत्येक सदस्याला उत्पादनाच्या निर्मितीत थेट सहभागी होण्याची आणि आपल्या कामाची एंड-टू-एंड जबाबदारी घेण्याची संधी दिली जाते.

Web Title: Kemory launches in india ai memory layer lets users keep their knowledge and context across ai tools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान
1

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स
2

Harry Potter चाहत्यांसाठी Realme ची मोठी भेट; Hogwartsच्या जादुई दुनियेत घेऊन जाणार खास स्मार्टफोन एडीशन, असे आहेत फीचर्स

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…
3

Tech News: ऑफर ऑफर ऑफर! Samsung चा ‘हा’ टॅब्लेट घेताय? मग डिस्काउंटचे पर्याय वाचाच…

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स
4

Itel चा भन्नाट ‘टफ’ फोन बाजारात दाखल! 2 मीटर ड्रॉप प्रोटेक्शनपासून सुपर साऊंडबॉक्सपर्यंत… असे आहेत डिव्हाईसचे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.