
1 जानेवारीपासून बदलणार मेसेजिंग ॲप्स वापरण्याची पद्धत! काय आहे नवा सिम बाइंडिंग नियम? जाणून घ्या सविस्तर
DoT ने 28 नोव्हेंबर 2025 रोजी टेलिकॉम सायबर सिक्योरिटी रुल्स, 2024 अंतर्गत सिम बाइंडिंग निर्देश जारी केले होते. सरकारने 1 डिसेंबर 2025 रोजी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) द्वारे हा आदेश सार्वजनिक केला. सुरुवातीला हा नियम लागू करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र त्यानंतर, मर्यादा वाढवत सरकारने 31 डिसेंबर 2026 पर्यंतचा वेळ दिला आहे. सुरुवातीला हे निमय व्हॉट्सॲप, टेलीग्राम, स्नॅपचॅट, अराटाई, शेयरचॅट, जोश, जियोचॅट आणि सिग्नल या ॲप्ससाठी जारी करण्यात आला. हा नियम अशा ॲप्ससाठी जारी केला जाणार आहे जे, कम्युनिकेशन सर्विस ऑफर करतात आणि यूजर्सची ओळख पटवण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी भारतीय मोबाईल नंबरचा वापर करतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
सिम बाइंडिंग नियमांतर्गत, मेसेजिंग ॲप्सना यूजर्सच्या रजिस्टर्ड इंडियन मोबाईल नंबरच्या ॲक्टिव सिम कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. जर सिम कार्ड फोनमधूनस काढले असेल किंवा सिम कार्ड ॲक्टिव्ह नसेल तर ॲप त्या डिव्हाईसमध्ये काम करणार नाही. म्हणजेच डिव्हाईसमधून सिम कार्ड बाहेर काढताच ॲप बंद होईल, तुम्ही त्याचा वापर करू शकणार नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपवर ट्रॅकर फीचर जारी केले जाणार आहे. यामध्ये तपासले जाणार आहे की, तुमच्या फोनमध्ये सिम आहे की नाही. जारी केल्या जाणाऱ्या या नव्या नियमांचा परिणाम अशा लोकांवर होऊ शकतो, जे सहसा त्यांचे सिम कार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये स्विच करत असतात. या नियमांमुळे डिजीटल स्कॅमला आळा घालण्यासाठी मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. तसेच, वेब वर्जनसाठी देखील नवीन नियम जारी केला जाणार आहे. जर एखादा यूजर ॲपच्या वेब वर्जनचा वापर करत असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. पूर्वी वेब वर्जन वापरताना एका ठरावीक वेळेनंतर पुन्हा लॉगिन करण्याची गरज भासत होती. मात्र आता सरकारने जोखमीवर आधारित नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ans: या नियमांनुसार, मेसेजिंग ॲपवरील अकाउंट हे रजिस्टर केलेल्या भारतीय मोबाईल नंबरच्या ॲक्टिव्ह सिम कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, हे नियम १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहेत.
Ans: नियमांनुसार, रजिस्टर केलेले सिम कार्ड फोनमधून काढल्यास किंवा ते निष्क्रिय झाल्यास संबंधित डिव्हाइसवर ॲपच्या वापरावर परिणाम होऊ शकतो.