Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या
किबोर्डच्या मदतीने तुम्ही कंटेट कॉपी आणि पेस्ट करू शकता. कॉपी करण्यासाठी Ctrl+C आणि पेस्ट करण्यासाठी Ctrl+V या कीचा वापर केला जातो. तसेच, Ctrl+X च्या मदतीने तुम्ही कोणताही टेक्स्ट किंवा फाईल कट करू शकता. तसेच, जर तुमच्याकडून चुकून कोणते काम झाले तर Ctrl+Z च्या मदतीने तुम्ही अंडू करू शकता. तर Ctrl+Y दाबून रीडू करू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
जर कंप्युटरमध्ये एखादी विंडो ओपन असेल तर प्रत्येकवेळी माऊसच्या मदतीने दुसरी विंडो निवडण्याची गरज नाही. तुम्ही किबोर्डमध्ये Alt+Tab दाबून कंप्युटरमधील विंडोजमध्ये अतिशय वेगाने स्विच करू शकता. जेव्हा तुम्ही ब्राऊझर, वर्ड आणि दुसऱ्या ॲप्सवर एकाचवेळी काम करत असाल तर अशावेळी हे फीचर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
किबोर्डच्या मदतीने तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. विंडोज कंप्युटरमध्ये PrtScn बटन संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी मदत करू शकतो. तसेच, Windows+Shift+S दाबून तुम्ही स्क्रीनच्या कोणताही विशिष्ट भाग सिलेक्ट करून त्या स्क्रीनशॉट घेऊ शकता. यामुळे महत्त्वाची माहिती सेव्ह आणि शेअर करणं आणखी सोपं होतं.
कंप्युटर किबोर्डच्या मदतीने फाईल्स आणि फोल्डर मॅनेज करणं देखील अतिशय सोपं होतं. Windows+E दाबून फाईल एक्सप्लोअर ओपन करू शकता. तसेच, एखादी फाईल निवडल्यानंतर F2 दाबून त्याचे नाव देखील अगदी सहज बदलले जाऊ शकते. डिलीट केल्याने फाईल रिसायकल बिनमध्ये जाते.
Ctrl+T दाबून नवीन स्क्रीन टॅब ओपन करू शकता. जर तुम्हाला आधीपासून सुरु असलेला टॅब बंद करायचा असेल तर Ctrl+W दाबू शकता. तसेच, जर एखादा टॅब चुकून बंद झाला तर Ctrl+Shift+T दाबून तो टॅब पुन्हा ओपन करू शकता. तसेच एखादी वेबसाईट वेगाने सर्च करण्यासाठी Ctrl+L दाबून सहजपणे ॲड्रेस बार उघडू शकता.
जर तुम्हाला काही वेळासाठी तुमच्या कंप्युटरपासून दूर जायचे असेल तर तुम्ही माऊसने कंप्युटर लॉक करण्याऐवजी Windows+L दाबू शकता. यामुळे कंप्युटर त्वरित लॉक होईल. यामुळे कोणीही दुसरा व्यक्ती तुमच्या कंप्युटरचा वापर करू शकणार नाही.






