Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, 'या' टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना नेहमी ट्रेंडिंग टॉपकची निवड करा. कोणतीही पोस्ट किंवा रिल तयार करण्यापूर्वी सण, व्हायरल बातम्या, नवीन ट्रेंड्स याबद्दल माहिती मिळवा. यामुळे तुम्ही लोकांना तुमच्या कंटेटकडे आकर्षित करू शकता. ट्रेंडिंग विषय आणि ऑडिओमुळे तुमचा कंटेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. (फोटो सौजन्य – AI Created)
कोणताही व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताना त्या व्हिडीओचे पहिले काही सेकंद यूजर्सना आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. जर तुम्ही शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात बोरिंग किंवा कंटाळवाणी असेल तर यूजर्स तुमचा व्हिडीओ स्किप करण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हिडीओच्या सुरुवातीला प्रश्न विचारणं, चकित करणारी माहिती देणं किंवा व्हिडीओमध्ये काय खास असणार हे सांगण, ही चांगली सुरुवात ठरू शकते.
केवळ व्हिडीओ सुंदर आहे, म्हणून प्रत्येकवेळी व्ह्युज मिळत नाही. असा कंटेट तयार करा ज्यामधून काही शिकू शकता, माहिती मिळू शकते किंवा लोकांचे मनोरंजन केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, सोप्या टिप्स, छोटी माहिती, समस्यांचे उत्तर, किंवा एखादी मजेदार माहिती. जेव्हा लोकांना वाटेल की तुम्ही शेअर केलेला कंटेट त्यांच्या फायद्याचा आहे, तेव्हाच तुमचा कंटेट व्हायरल होऊ शकतो.
चांगला आणि आकर्षक कंटेट तयार केल्यानंतर हा कंटेट योग्यवेळी पोस्ट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही अकाऊंट इनसाइट्समध्ये जाऊन पाहू शकता की तुमचे फॉलोवर्स कोणत्या वेळी जास्त ॲक्टिव्ह असतात. हीच वेळी लक्षात घेऊन रिल्स आणि पोस्ट शेअर करण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्ही वारंवार एकाच प्रकारचा कंटेट अपलोड केला तर तुमचा कंटेट कंटाळवाणा वाटू शकतो. त्यामुळे सतत वेगवेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करण्याचा प्रयत्न करा. रिलचे कॅप्शन आणि कव्हर पेज देखील मजेशीर ठेवा.






