कॉन्सर्ट्सदरम्यान Kiss केलं तर तुम्हीही कॅमेऱ्यात व्हाल कैद! 'Kiss Cam' नक्की आहे तरी काय, ज्याने CEO आणि HR ला रंगेहात पकडलं
Coldplay कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने खरंच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. Coldplay कॉन्सर्टमध्ये असं काही तरी झालंय ज्यामुळे तेथे असलेल्या सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. Coldplay कॉन्सर्टदरम्यान ‘Kiss Cam’ मोमेंटवेळी कॅमेरा एका अशा जोडप्यावर जाऊन थांबला, जे कॉन्सर्ट दरम्यान एकमेकांच्या अत्यंत जवळ होते. ज्यावेळी त्यांना समजलं की ते स्क्रीनवर दिसत आहेत, दोघांनीही आपला चेहरा लपवला.
Coldplay कॉन्सर्ट दरम्यानचा सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ अमेरिकेतील मोठी टेक कंपनी Astronomer चे सीईओ अँडी बायरन आणि कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर क्रिस्टिन कॅबोट यांचा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ Kiss Cam द्वारे कॅप्चर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान काय आहे, कशा प्रकारे कामं करतं याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अँडी बायरनने क्रिस्टिन कॅबोट यांना मिठी मारली होती. पण जेव्हा त्यांचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला तेव्हा दोघांनाही चेहरा लपवला. अँडी लगचेच खाली वाकला आणि क्रिस्टिनने देखील तिचा चेहरा लपवला. यावेळी Coldplay चा लीड सिंगर Chris Martin ने मंचावरून म्हटलं की, लूक अॅट धिस टू, आयदर दे आर हॅविंग अॅन अफेअर ऑर दे आर व्हेरी शाय. म्हणजेच या दोघांकडे बघा… एकतर त्यांचे प्रेमसंबंध आहेत किंवा ते खूप लाजाळू आहेत. या कॉन्सर्टनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
If Astronomer CEO Andy Byron and “Chief People Officer” (HR Officer) Kristin Cabot had simply smiled and waved at the Coldplay concert, nobody would have noticed. But, they’re too stupid and their guilty reactions gave them away. KARMA! 🤣pic.twitter.com/WnY6DnLm4X
— Truth Detector (@TruthDetector51) July 18, 2025
Kiss Cam एक फन अॅक्टिविटी असते. ही अॅक्टिविटी स्पोर्ट्स इवेंट्स किंवा म्यूजिक कॉन्सर्ट्स दरम्यान केली जाते. यावेळी कॅमेरा तिथे उपस्थित असलेल्या कोणत्याही जोडप्यावर थांबतो आणि ती जोडी स्क्रीनवर दिसू लागते. यावेळी प्रेक्षकांना अशी आशा असते की, हे कपल्स किस करू शकतात. प्रेक्षकांना शोमध्ये गुंतवून ठेवण्याचा हा एक मजेदार मार्ग आहे, परंतु कधीकधी कॅमेरे अशा लोकांना देखील पकडतात जे एकत्र दिसू इच्छित नाहीत – जसे त्यांनी यावेळी केले.
Ashish Chanchlani की CarryMinati, कोणं करत सर्वात जास्त कमाई? सोशल मीडियावर कोणाची हवा?
Astronomer एक अमेरिकेतील टेक कंपनी आहे, ज्याची व्हॅल्यू 1 डॉलर बिलीहून अधिक आहे. Andy Byron जुलै 2023 पासून Astronomer कंपनीचे CEO आहेत. याआधी त्यांनी अनेक सायबर सुरक्षा आणि सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. क्रिस्टिन कॅबोट नोव्हेंबर 2024 पासून या कंपनीच्या Chief People Officer आहेत. कंपनीच्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांशी विश्वासार्ह संबंध निर्माण करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही विवाहित आहेत आणि त्यांना मुले आहेत. आता या किस कॅम मुमेंटमुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.