Instagram युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार फीचर्सचा डबल बोनस, काय असणार खास? जाणून घ्या
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या इंस्टाग्रामचे करोडो अॅक्टिव्ह युजर आहेत. इंस्टाग्रामवर अनेक नवीन फीचर्स रिलीज केले जातात. हे फीचर्स युजर्सना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी रिलीज केले जात असतात. फोटो आणि रिल्स शेअर करणं हे इंस्टाग्राम युजर्सचं सर्वात आवडतं काम आहे.
तरुणांमध्ये इंस्टाग्रामची वेगळीच क्रेझ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकजण इंस्टाग्रामचा वापर करत असतो आणि यामुळेच कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असते. कंटेंट क्रिएटर्सना फायदेशीर ठरतील असे फीचर्स कंपनी रिलीज करते. आता देखील कंपनीने त्यांचे युजर्ससाठी काही नवीन फीचर्स रिलीज करण्याची योजना आखली आहे. आगामी फीचर्सबाबत इंस्टाग्रामचे प्रमुख हेड एडम मोसेरी यांनी माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्रामचे प्रमुख हेड एडम मोसेरी यांनी सांगितलं आहे की, इंस्टाग्रामला अधिक चांगलं बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे युजर्सना नवीन आणि क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करणं अधिक सोप्पं होणार आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, क्रिएटर्सकडून शेअर केले जाणारे अपडेट्स माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या कल्पना जगासमोर आणायच्या आहेत. पण यासाठी त्यांना हिम्मत हवी आहे आणि अशाच क्रिएटर्ससाठी नवीन फीचर्स फायद्याचे ठेवणार आहे.
ट्रायल रील्स (Trial Reels) – हे एक मोठं अपडेट असणार आहे. या अपडेटच्या मदतीने क्रिएटर्स त्यांची रिल्स आधी अशा लोकांसोबत शेअर करू शकणार आहेत, जे त्यांना फॉलो करत नाही. या ऑप्शनमुळे क्रिएटर्सवरील दबाव कमी होणार आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
क्वाइट पोस्टिंग (Quiet Posting) – इंस्टाग्राम एक क्वाइट पोस्टिंग फीचरची देखील चाचणी करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या प्राफाईलवर पोस्ट शेअर करू शकतात. पण ती तात्काळ फीडमध्ये दिसणार नाही. यामुळे युजर्सना त्यांच्या पोस्टवर सर्वाधिक कंट्रोल मिळणार आहे.
ग्रिडवर पोस्ट री-ऑर्डर करा – इंस्टाग्रामवर ग्रिडवर पोस्टला री-ऑर्डर करण्याचे ऑप्शन देखील उपलब्ध होणार आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या ग्रीडवर त्याच्या आवडीनुसार पोस्ट मागे पुढे करू शकणार आहेत. हे फीचर्स क्रिएटर्ससाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहेत.
Edits अॅपमध्ये AI टूल्स – व्हिडिओच्या बाबतीत, इंस्टाग्राम त्यांच्या एडिट अॅ९पमध्ये अधिक गुंतवणूक करत आहे. यामध्ये रेस्टाईल सारखे नवीन AI-पावर्ड टूल्स समाविष्ट असतील, जे यूजर्सना फक्त एका टॅपमध्ये व्हिडिओचा लूक आणि फील बदलण्यास मदत करतील.
Laptop vs Desktop: तुमच्यासाठी कोण ठरणार बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी इथे जाणून घ्या सर्वकाही
नवा फॉन्ट आणि Spotify इंटीग्रेशन – क्रिएटिविटी वाढण्यासाठी एक नवीन स्टोरिज आणि रिल्स फॉन्ट इंस्टाग्रामवर येत आहे.
ड्राफ्ट्स (Drafts) – टायरेल हॅम्प्टन आणि यंग एम्परर्स सारख्या क्रिएटर्सना पाठिंबा देण्यासाठी इंस्टाग्रामने ड्राफ्ट्स नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे.