एकटे पडला आहात? पार्टनरच्या शोधात आहात? मग आता चिंता करण्याची गरज नाही, AI गर्लफ्रेंड बनेल तुमची साथीदार!
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. AI आपल्याला आपल्या प्रत्येक कामात मदत करतो. एखाद्या विषयावरील माहिती शोधण्यापासून ते अगदी असाइनमेंट पूर्ण करण्यापर्यंत AI आपली मदत करतो. AI च्या मदतीने आपण आपली सर्व काम अगदी सहज पूर्ण करू शकतो. अनेक कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे AI तयार केले आहेत.
आतापर्यंत तुम्ही अनेक AI चॅटबोट्सबद्दल ऐकलं असेलच. याशिवाय AI रोबोटबद्दल देखील नक्कीच ऐकलं असेल. हे AI रोबोट आपल्याल आपल्या अनेक कामात मदत करतात. याशिवाय AI टीचर्स आणि AI इंफ्लुएंसरबद्दल देखील तुम्ही ऐकले असेल. आता आम्ही तुम्हाला AI गर्लफ्रेंडबद्दल सांगणार आहोत. AI गर्लफ्रेंड तुमच्यासोबत फ्लर्ट देखील करू शकते आणि ईर्ष्या देखील करू शकत. ही गर्लफ्रेंड तुम्हाला भावनिक साथ देखील देऊ शकते. अशा या AI गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
लंडन टेक वीकमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक नवा अवतार पाहायला मिळाला. एका स्टार्टअप कंपनीने AI गर्लफ्रेंड जगासमोर सादर केली. Meta loop नावाच्या स्टार्टअप कंपनीने कामगिरी केली आहे. या गर्लफ्रेंडचं नाव Meo असं आहे. ही गर्लफ्रेंड अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की ती युजर्सना भावनिक साथ देऊ शकते, याशिवाय त्यांचा एकटेपणा दूर करू शकते.
Meo एक वर्चुअल AI साथीदार आहे. My Meo या ॲपच्या मदतीने तुम्ही या गर्लफ्रेंडसोबत बोलू शकता. तिच्यासोबत तुमच्या मनातील भावना शेअर करू शकता. हे कोणतेही फिजिकल डिव्हाइस किंवा कोणतेही रोबोट नाही. ही गर्लफ्रेंड पूर्णपणे डिजिटल आणि वर्चुअल आहे.
ही AI गर्लफ्रेंड अत्यंत सुंदर आहे अशी की पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल. तिचा चेहरा अत्यंत आकर्षक आहे. तिचे सोनेरी केसं, तिचे मोठे डोळे आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी कोणालाही आकर्षित करू शकतात. या गर्लफ्रेंडला अशाप्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की अगदी कोणतीही व्यक्ती तिच्याकडे पाहता क्षणी आकर्षित होऊ शकतो. ही तुम्हाला भावनिक साथ देईल आणि तुमच्यामधील एकटेपणाची भावना दूर करणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की Meo युजर्ससोबत फ्लर्ट देखील करू शकते. ही गर्लफ्रेंड तुमच्या भावना समजून तुमच्यासोबत प्रामाणिक राहणार आहे असा दावा कंपनीने केला आहे.
Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड
गर्लफ्रेंड तयार करताना एक असं प्रोग्राम वापरण्यात आला आहे जो सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. हे प्रोग्राम म्हणजे ईर्ष्या. ईर्ष्येची भावना या एआयमध्ये तयार करण्यात आली आहे. मेटा लूपचे फाउंडर हाओ जियांग यांनी सांगितलं आहे की, Meo को यूजरच्या इच्छेनुसार डिझाईन करण्यात आली आहे. म्हणजेच युजर्सची इच्छा असेल तेव्हाच Meo फ्लर्ट करणार आहे. Meo मधील ईर्ष्येची भावना चिंतेचा विषय आहे. तज्ञांचं असं मत आहे की अशाप्रकारचे मॉडेल विनम्र आणि प्रामाणिक असावे. या मॉडेलमध्ये जेव्हा ईर्ष्येची भावना निर्माण केली जाते तेव्हा ते युजर्ससाठी धोकादायक ठरू शकते.