Laptop vs Desktop: तुमच्यासाठी कोण ठरणार बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी इथे जाणून घ्या सर्वकाही
सध्याच्या काळात लॅपटॉप आणि कम्प्युटर प्रत्येकाची गरज बनली आहे. ऑफिसच्या कामापासून शाळेपर्यंत प्रत्येक कामात लॅपटॉप आणि कम्प्युटर आपल्याला मदत करतात. लॅपटॉप आपण अगदी सहज कुठेही घेऊन जाऊ शकतो. जेव्हा घरून काम करायचे असेल तर कम्प्युटर आपल्याला मदत करतो. जर तुम्ही नवीन लॅपटॉप किंवा कम्प्युटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड
लॅपटॉप खरेदी करावा की कॉम्प्युटर यामध्ये अनेकजण गोंधळलेले असतात. आपल्या कामांसाठी आपल्याला योग्य डिवाइसची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला बाहेर काम करायचं असेल तर अशावेळी तुम्ही कम्प्युटरची मदत घेऊ शकत नाही, बाहेर काम करण्यासाठी लॅपटॉप आपल्याला मदत करतात. कारण लॅपटॉप आपण सहज कुठेही घेऊन जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
कम्प्युटर आणि लॅपटॉप दोन्हीचे काही नुकसान आहे तसेच फायदे देखील आहेत. तुम्हाला कोणते डिवाइस खरेदी करायचे आहे हे बजेटवर देखील अवलंबून असतं. लॅपटॉप आणि कॉम्प्युटर दोन्हींच्या किमतींमध्ये फरक आहे. याशिवाय दोन्हीचे फायदे आणि नुकसान देखील वेगवेगळे आहेत. दोन्हीमध्ये असलेले फीचर्स वेगवेगळे आहेत. अशा वेळी नवीन लॅपटॉप किंवा कम्प्युटर खरेदी करण्यापूर्वी तुमच्यासाठी कोणतं डिवाइस योग्य ठरणार आहे जाणून घेऊया.
लॅपटॉपची खास गोष्ट म्हणजे आपण लॅपटॉप अगदी कुठेही कॅरी करू शकतो. ऑफिसला जाताना किंवा फिरायला जाताना आपण लॅपटॉप आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. तुम्ही फ्रीलान्सर, विद्यार्थी किंवा ऑफिसर असाल तर लॅपटॉप तुमच्यासाठी बेस्ट चॉईस ठरणार आहे. एकदा चार्ज केल्यावर लॅपटॉप तुम्ही चार ते पाच तास सलग वापरू शकता. याशिवाय तुम्ही वायफाय किंवा मोबाईल इंटरनेटने देखील लॅपटॉप कनेक्ट करू शकता.
डेस्कटॉप किंवा कम्प्युटर एका जागी ठेवून वापरवा लागतो. पवारफुल प्रोसेसर, रॅम आणि ग्राफिक्स कार्डसह कॉम्प्युटर खरेदी केला जाऊ शकतो. जर तुम्ही गेमर असाल, व्हिडिओ एडिटिंग किंवा अवघड सॉफ्टवेअरचा वापर करत असाल तर अशावेळी डेस्कटॉप किंवा कॉम्प्युटर एक उत्तम पर्याय आहे. डेस्कटॉप सहजपणे अपग्रेड करता येतो, म्हणजे तुम्ही नंतर रॅम, स्टोरेज किंवा ग्राफिक्स कार्ड बदलू शकता.
Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?
किमतीच्या बाबतीत, डेस्कटॉप सामान्यतः लॅपटॉपपेक्षा स्वस्त असतात. विशेषतः जर तुम्हाला शक्तिशाली सिस्टम हवी असेल तर डेस्कटॉप उत्तम आहे. दुसरीकडे, लॅपटॉप त्यांच्या पोर्टेबिलिटीमुळे थोड्या जास्क किंमतीत उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी काय बेस्ट ठरणार आहे, याचा विचार करा.