दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताय? सावधान... या 5 सायबर फ्रॉडमुळे रिकामं होऊ शकतं तुमचं अकाऊंट
शेकडो ईमेलमध्ये महत्त्वाचा मेल होतोय मिस? Gmail ची ही ट्रिक ठरेल फायदेशीर, मेल येताच वाजेल रिंगटोन
सेल, ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या काळात सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करतात, ज्या हुबेहुब खऱ्या वेबसाईटसारख्या दिसतात. या बनावट वेबसाईट्सवर स्मार्टफोन, टिव्ही आणि इतर वस्तू अत्यंत कमी किंमतीत विकण्याचा दावा केला जातो. या ऑफर्स पाहून ग्राहक आकर्षित होतात आणि बनवाट वेबसाईटवरून सामान ऑर्डर करतात. पण पेमेंट केल्यानंतर वस्तू डिलीवर केली जात नाही किंवा डॅमेज प्रोडक्ट डिलीव्हर होते. यामुळे स्कॅम आणि फ्रॉडपासून सुरक्षा करण्यासाठी नेहमी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करा. (फोटो सौजन्य: Pinterest)
दिवाशी सुरु होण्याआधीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे इंस्टाग्राम आणि फेसबूक दिवाळीच्या नावाने विविध जाहिराती दिसतात. या जाहिरातींमध्ये ब्रँडेड प्रोडक्ट्सवर 70 ते 80 टक्के डिस्काऊंट ऑफर करण्याचा दावा केला जातो. तसेच शॉपिंगसाठी एक लिंक देखील दिली जाते. या लिंक ग्राहकांना बनावट वेबसाईटवर घेऊन जातात, जिथे ग्राहकांची फसवणूक केली जाऊ शकते. यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील ऑफर्स तपासा.
दिवाळीपूर्वी सायबर गुन्हेगार दिवाळी गिफ्ट, कॅशबॅक किंवा इतर बक्षीसे जिंकण्यासाठी बनावट क्यूआर कोड तुम्हाला पाठवता. हे कोड स्कॅन करून तुम्हाला यूपीआय पिन एंटर करण्याचा पर्याय येतो. पिन एंटर करताच तुमचं अकाऊंट रिकामं होतं. लक्षात ठेवा की, पैसे रिसीव्ह करण्यासाठी कोणताही क्यूआर कोड नसतो, तसेच यूपीआय पिन देखील एंटर करावा लागत नाही.
सायबर गुन्हेगार बनावट मेसेज करतात, ज्यामध्ये लिहीले असते की, तुमची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे किंवा पार्सल वेळेत पोहोचू शकत नाही. यात डिलिव्हरीची वेळ बदलण्याची विनंती असू शकते, किंवा तुम्हाला परतावा (रिफंड) मिळवण्यासाठी एखादी लिंक पाठवली जाऊ शकते. अशा लिंक्सवर क्लिक करून तुम्हाला बँक डिटेल्स एंटर करण्यास सांगितलं जाऊ शकतं. यानंतर तुम्ही दिलेल्या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार तुमची फसवणूक करू शकतात.
लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा
दिवाळीच्या काळात, बक्षिसांच्या ऑफर्स, विशेष शॉपिंग बोनस किंवा कॅशबॅकच्या आमिषातून लोकांना लक्ष्य केले जाऊ शकते. फसवणूक करणारे लोक, ही बक्षिसे मिळवण्यासाठी, व्यक्तींना काही लिंकवर क्लिक करायला, बनावट फॉर्म भरायला किंवा ‘प्रोसेसिंग फी’ भरायला सांगू शकतात.
Ans: दिवाळीच्या सेलमध्ये बनावट शॉपिंग वेबसाइट्स, सोशल मीडियावरील फेक जाहिराती, QR कोड स्कॅम, बनावट डिलिव्हरी मेसेज आणि फेक कॅशबॅक ऑफर्सद्वारे फसवणूक होऊ शकते.
Ans: वेबसाइटची URL काळजीपूर्वक तपासा. अवास्तव स्वस्त ऑफर्स, चुकीचे स्पेलिंग, संशयास्पद पेमेंट लिंक आणि अपूर्ण संपर्क माहिती असल्यास सावध राहा. शक्यतो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरूनच खरेदी करा.
Ans: सायबर गुन्हेगार Instagram आणि Facebook वर आकर्षक डिस्काउंटच्या बनावट जाहिराती देतात. त्यातील लिंकवर क्लिक केल्यास बनावट वेबसाइटवर नेले जाऊ शकते आणि तुमची वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती चोरली जाऊ शकते.






