OMG! दमदार बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर, Lava घेऊन येतोय Dragon Smartphone; सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असणार किंमत
भारतात लवकरच Lava चा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच केला जाणार असून तो अनेक फीचर्सनी सुसज्ज असणार आहे. कंपनी हा आगामी स्मार्टफोन ड्रॅगन नावाने लाँच करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, Lava चा हा आगामी स्मार्टफोन भारतात 25 जुलै रोजी लाँच केला जाणार आहे. स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी त्याच्या काही फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे.
Tech Tips: 3 मॅजिकल बटण तुमचा iPhone बनवतील सुपरफास्ट, 90 टक्के लोकांना माहिती नाही ही जबरदस्त Trick
नावामुळे या स्मार्टफोनची प्रचंड चर्चा सुरु आहे. हा स्मार्टफोन Lava Blaze Dragon या नावाने लाँच केला जाणार आहे. अपकमिंग डिवाइस अनेक पावरफुल फीचर्सने सुसज्ज असणार आहे. कंपनीने अपकमिंग डिवाइसच्या चिपसेटचा खुलासा केला आहे. याशिवाय आता या स्मार्टफोनच्या किंमतीचा देखील खुलासा करण्यात आला आहे. अपकमिंग Lava Blaze Dragon स्मार्टफोन 50-मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह डुअल रियर कॅमेरा सेटअप ऑफर करणारा आहे. हा एक बजेट आणि पावरफुल स्मार्टफोन असणार आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये फोनच्या पाठीमागे एक ड्रॅगन दिसत आहे. त्यामुळे युजर्समध्ये या फोनबाबत उत्सुकता वाढली आहे. (फोटो सौजन्य – X)
Lava Blaze Dragon is launching this month in India with the Snapdragon 4 Gen 2 paired with UFS 3.1, and Android 15 — under ₹10,000! pic.twitter.com/GeZtxeK3Jq
— Abhishek Yadav (@yabhishekhd) July 18, 2025
Lava Blaze Dragon मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेनरेशन 2 चिपसेट दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन अनेक बजेट फोन्समध्ये उपलब्ध आहे. या चिपसेटवरून अंदाज येतो की Lava Blaze Dragon हा फोन 5G असणार आहे. कंपनीने फोनचा टिझर शेअर करताना डिव्हाइसचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये डिव्हाइसच्या खालच्या काठावर स्पीकर ग्रिल, USB टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक दिसत आहे.
Lava Blaze Dragon स्मार्टफोन गोल्डन कलरमध्ये लाँच केला जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा दिला जाणार आहे. ज्यामध्ये AI बेस्ड 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर असणार आहे. फोनच्या कॅमेरा सेटअपच्या बाजूला बुलेटसारखा एलईडी फ्लॅश दिला जाणार आहे. डिव्हाइसमध्ये 18W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
किंमतीबद्दल बोलताना, टिपस्टर अभिषेक यादवने X वर पोस्ट केले आहे की भारतात Lava Blaze Dragon ची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. हा फोन काळ्या रंगात दिसत आहे. हा डिव्हाइस 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजता भारतीय वेळेनुसार लाँच केला जाईल आणि अमेझॉनवर उपलब्ध असेल. मिळालेल्या माहितीनुसार, Lava Blaze Dragon हा बजेट किंमतीत उपलब्ध असणारा एक दमदार स्मार्टफोन असणार आहे. जर तुम्ही देखील नवनी बजेट स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी Lava Blaze Dragon एक उत्तम पर्याय असणार आहे.