Tech Tips: 3 मॅजिकल बटण तुमचा iPhone बनवतील सुपरफास्ट, 90 टक्के लोकांना माहिती नाही ही जबरदस्त Trick
जगभरातील लोकांमध्ये आयफोनची क्रेझ आहे. आयफोनच्या स्टाईल आणि लूकने लोकांना भुरळ घातली आहे. आजही अनेकांचं असं स्वप्न आहे की आपल्याकडे एक तरी आयफोन असावा. आयफोनचे फीचर्स आणि सिक्युरिटी यामुळे लोकं अँड्रॉइड फोन खरेदी करण्यापेक्षा आयफोन खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देतात.
आयफोनची कॅमेरा क्वालिटी आणि कमाल फीचर्स लोकांना प्रचंड आवडतात. आयफोन कितीही चांगला असला तरी त्यातील काही गुण लोकांना वारंवार त्रास देत असतात. असाच एक गुण म्हणजे फोन सतत हँग होणे आणि स्लो होणं. फोनचा वापर करताना जर आपला फोन हँग झाला किंवा स्लो झाला तर आपल्याला वैताग येतो. फोनचं काय करावं हेच समजत नाही. तुम्ही अशाच समस्येचा सामना करत असाल तर तुमच्यासाठी मॅजिकल ट्रिक आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा आयफोन अगदी नव्या सारखा आणि फास्ट करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
गेल्या काही दिवसांपासून तुमचा आयफोन देखील स्लो झाला आहे? अॅप ओपन करण्यासाठी बराच वेळ लागत आहे का? याशिवाय फोन सतत हँग देखील होतोय? चिंता करू नका. आता आम्ही तुम्हाला तुमच्या आयफोनसाठी मॅजिकल ट्रिक सांगणार आहोत. फोन सतत हँग होत असेल तर सर्विस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमचा आयफोन दुरुस्त करू शकणार आहात. आज आम्ही तुम्हाला एका अशा ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त तीन बटणे दाबावी लागतील, त्यानंतर तुमचा आयफोन पुन्हा सुपर फास्ट स्पीडने चालू होईल. आता आम्ही तुम्हाला जी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमचा आयफोन रीस्टार्ट होईल आणि आयफोनची बॅकग्राउंड प्रोसेस, टेम्पररी ग्लिच आणि RAM क्लीन होणार आहे.
तुम्ही ही ट्रिक फक्त iPhone 8 आणि त्यानंतरच्या सर्व मॉडेल्समध्ये वापरू शकता, म्हणजेच तुम्ही ही ट्रिक iPhone SE 2nd GEN, iPhone X, 11, 12, 13, 14, 15 आणि अगदी नवीनतम 16 सीरीजमध्ये देखील वापरू शकता. या ट्रिकचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.