Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच रिटायर होणार mAadhaar… UIDAI ने सोशल मीडियावर केली घोषणा; नव्या अ‍ॅपसह यूजर्सचा अनुभव होणार आणखी स्मार्ट

UIDAI mAadhaar Update: UIDAI ने सध्या वापरात असलेले mAadhaar अ‍ॅप लवकरच बंद होणार असल्याची घोषणा केली आहे. यूजर्सना अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि वेगवान अनुभव देण्यासाठी नवीन Aadhaar App लाँच करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2026 | 10:06 AM
लवकरच रिटायर होणार mAadhaar... UIDAI ने सोशल मीडियावर केली घोषणा; नव्या अ‍ॅपसह यूजर्सचा अनुभव होणार आणखी स्मार्ट

लवकरच रिटायर होणार mAadhaar... UIDAI ने सोशल मीडियावर केली घोषणा; नव्या अ‍ॅपसह यूजर्सचा अनुभव होणार आणखी स्मार्ट

Follow Us
Follow Us:
  • mAadhaar अ‍ॅप लवकरच बंद होणार असल्याची UIDAI ने घोषणा केली.
  • नवीन Aadhaar अ‍ॅपमध्ये QR sharing आणि फेस ऑथेंटिकेशन फीचर मिळणार.
  • यूजर्स आता अ‍ॅपमधूनच पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करू शकणार.
यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने शुक्रवारी घोषणा केली आहे की, सध्या उपलब्ध असलेले mAadhaar अ‍ॅप लवकरच बंद होणार आहे. याबाबत सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत घोषणा करण्यात आली आहे. तसेच अथॉरिटीने यूजर्सना अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या नव्या Aadhaar अ‍ॅपवर शिफ्ट होण्याचा सल्ला दिला आहे.

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवीन अ‍ॅप आयफोन यूजर्ससाठी अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर आणि अँड्रॉईड यूजर्ससाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. नवीन अ‍ॅप नागरिकांना त्यांची माहिती सुरक्षित ठेण्यासाठी, अपडेट करण्यासाठी आणि दुसऱ्यांसोबत शेअर करण्यासाठी मदत करणार आहे. नव्या अ‍ॅपमध्ये क्यूआर-बेस्ड आधार शेयरिंग, फेस ऑथेंटिकेशन, बायोमेट्रिक लॉक कंट्रोल आणि सिलेक्टिव इंफॉर्मेशन शेयरिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यामुळे यूजर्सचा अनुभव अधिक स्मार्ट होणार आहे. (फोटो सौजन्य – X)

UIDAI ने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत UIDAI ने माहिती दिली आहे की, mAadhaar अ‍ॅप लवकरच बंद होणार आहे. पोस्टमध्ये असं सांगितलं आहे की, mAadhaar ॲप लवकरच बंद होत आहे. आता नवीन Aadhaar ॲपसह अधिक स्मार्ट, वेगवान आणि सुरक्षित डिजिटल प्रवासाचा अनुभव घ्या. सुरक्षित क्यूआर-आधारित Aadhaar शेअरिंगपासून ते वर्धित गोपनीयता नियंत्रणे आणि आधार सेवांमध्ये अखंड प्रवेशापर्यंत… नवीन ॲप तुमची डिजिटल ओळख, अनुभव अधिक सोपा करण्यासाठी डिझाइन केले आहे. आताच आधार ॲप डाउनलोड करा.

यूजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी नवीन Aadhaar ॲप 13 भारतीय भाषांना सपोर्ट करते. UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, नवीन आधार ॲपमधील सर्वात मोठे फीचर क्यूआर-बेस्ड आधार शेयरिंग आणि ऑफलाइन आइडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे. ‘सिलेक्टिव शेयर’ फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचा आधार नंबर न सांगता त्यांची ओळख व्हेरिफाय करू शकतात.

The #mAadhaar App is retiring soon. Now experience a smarter, faster, and more secure digital journey with the new #AadhaarApp. From secure QR-based #Aadhaar sharing to enhanced privacy controls and seamless access to Aadhaar services — the new app is designed to make your… pic.twitter.com/snfeUx4Rgr — Aadhaar (@UIDAI) May 15, 2026

यूजर्स निवडू शकतात की, त्यांना कोणती माहिती शेअर करायची आहे, जसे फोटो, नाव, वय, लिंग, मोबाईल नंबर, पत्ता किंवा आधार स्टेटस. हा ॲप एक QR कोड देखील जनरेट करतो, ज्याला ओळखीसाठी ऑथराइज्ड टर्मिनल्सवर स्कॅन केला जाऊ शकतो. UIDAI चं असं म्हणणं आहे की, ॲपद्वारे यूजर्स आधार संबंधित मोबाईल नंबर आणि पत्ता थेट अपडेट करू शकणार आहेत. यूजर्स प्रोफाइल सेक्शनमध्ये जाऊन कुटूंबातील जास्तीत जास्त 5 सदस्यांना त्यांच्या अकाऊंटमध्ये जोडू शकणार आहेत.

फोटो शेअरिंगचा गेम बदलणार? Instagram च्या Instants अ‍ॅपची सर्वत्र चर्चा, Snapchat ला टक्कर देणार?

यामध्ये बायोमेट्रिक लॉकिंग कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत. याचा वापर करून फिंगरप्रिंट, फेस आणि आइरिस ऑथेंटिकेशन डेटा लॉक केला जाऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या डेटाचा कोणताही चुकीचा वापर केला जाऊ नये. गरज असल्यासे ॲपद्वारे हे लॉक हटवले देखील जाऊ शकते. जुन्या mAadhaar ॲपमधील डेटा नव्या ॲपवर ट्रांसफर होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.

नवीन आधार ॲपवर रजिस्टर करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

  • गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून नवीन ॲप डाऊनलोड करा.
  • आता ॲप ओपन करा आणि तुमची भाषा निवडा.
  • आता रजिस्ट्रेशनसाठी आधारला जोडलेला मोबाईल नंबर एंटर करा.
  • आता 12-डिजिट आधार नंबर एंटर करा आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करून प्रोसेर पूर्ण करा.
  • आता, तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करण्यास सांगितले जाईल. बॅकग्राउंडला पुरेसा प्रकाश असल्याची खात्री करा आणि तुम्ही चष्मा घालत असाल तर तो काढून ठेवा.
  • आता सहा अंकी पासवर्ड सेट करा, ज्याचा वापर ॲप ॲक्सेस करण्यासाठी केला जाणार आहे.
  • आता तुम्हाला ॲपच्या होम पेजवर नेले जाईल, जिथे तुम्ही तुमचे आधार कार्ड पाहू शकता, ते इतरांसोबत शेअर करू शकता आणि बायोमेट्रिक लॉक सेट करू शकता.

Web Title: Maadhaar will retire soon uidai shared post on social media users will get smarter experience on new app tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Aadhaar
  • Tech News
  • UIDAI

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.