
ऑटो मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! पुढील 2 वर्षांत ही कंपनी लाँच करणार तब्बल 6 इलेक्ट्रिक कार्स, ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
यापूर्वी वाहन निर्माता कंपनी केवळ महागडे आणि हाई-एंड इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्यावर फोकस करत होती. मात्र आता बदलत्या ऑटो क्षेत्रासोबतच कंपनी वेगवेगळ्या सेगमेंटध्ये इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्यावर अधिक भर देत आहे. याचा उद्देश असा आहे की, कंपनीला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचे आहे आणि ऑटो क्षेत्रात झेप घ्यायची आहे. सध्या लग्जरी गाड्यांच्या बाजारात देखील लोकं इलेक्ट्रिक गाड्यांना जास्त पसंती देत आहेत. यामुळेच कंपनी जास्तीच जास्त इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्यावर फोकस करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मर्सिडीज-बेंझच्या पुढील पिढीच्या इलेक्ट्रिक गाड्यांमधील पहिले मॉडेल CLA इलेक्ट्रिक हे आहे. ही गाडी कंपनीच्या नव्या MMA प्लॅटफॉर्म आणि सर्वात नवीन MB.OS सॉफ्टवेयरवर आधारित आहे, जे भविष्यातील इतर मॉडेल्सना देखील आधार देणार आहे. या गाडीमध्ये 800V इलेक्ट्रिक आर्किटेक्टरचा वापर करण्यात आला आहे.
मर्सिडीज-बेंझ त्यांच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा विचार करत आहे. यामध्ये SUV आणि सेडान दोन्ही समाविष्ट आहेत. कंपनीने तयार केलेल्या योजनेमध्ये GLC EV आणि E-Class EV सारखे मॉडेल्स देखील समाविष्ट आहेत. भारतात SUV ची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत GLC EV महत्त्वपूर्ण ठरू शकते. तसेच, जे ग्राहक लग्जरी सेडानला पंसती देतात, अशा ग्राहकांसाठी कंपनी C-Class EV लाँच करण्याची योजना आखत आहे. याशिवाय कंपनी 2026 मध्ये आणखी 2 इलेक्ट्रिक गाड्या लाँच करण्याची योजना आखत आहे. मात्र अद्याप या गाड्यांबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.
792 किमी रेंज अन् लग्जरी फीचर्स; Mercedes CLA EV भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
मर्सिडीज-बेंझने स्पष्ट केले आहे की, इलेक्ट्रिक गाड्यांसोबतच कंपनी पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सची विक्री देखील सुरु ठेवणार आहे. लक्झरी सेगमेंटमध्ये, लोकं अजूनही इलेक्ट्रिक कारचा वापर त्यांचे प्राथमिक वाहन म्हणून न करता, दुय्यम वाहन म्हणून करत आहेत. एसयूव्ही सेगमेंटमधील विक्रीमध्ये डिझेल मॉडेल्सचा वाटा अजूनही लक्षणीय आहे. ग्राहकांचे निर्णय किंमत, सरकारी प्रोत्साहन आणि वाहनाच्या पुनर्विक्री मूल्यावर देखील अवलंबून असतात