स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल परफॉर्मन्स! भारतात लवकरच एंट्री करणार Honda Prelude... ग्राहकांची उत्सुकता शिगेला
792 किमी रेंज अन् लग्जरी फीचर्स; Mercedes CLA EV भारतात लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
होंडा मोटरसायकलद्वारे भारतीय बाजारात लवकरच नवीन गाडी लाँच करण्याची तयारी केली जात आहे. कंपनी ही गाडी एक लक्झरी सेडान म्हणून सादर करण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – X)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाहन निर्मााता कंपनीद्वारे Honda Prelude लाँच केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
वाहन निर्मााता कंपनीद्वारे, या गाडीमध्ये दोन लीटरची क्षमता असलेले हाइब्रिड इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे, जे 104 किलोवॅट शक्ती आणि 182 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या इंजिनने गाडी 8.2 सेकेंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग देऊ शकते.
होंडा त्यांच्या आगामी गाडीमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स ऑफर केले जाऊ शकतात. या गाडीमध्ये एलईडी लाइट्स, 19 इंच अलॉय व्हील्स, 10.2 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, नऊ इंच इंफोटेनमेंट सिस्टम, एपल कार प्ले, एंड्राइड ऑटो, बोस ऑडियो सिस्टम, लेव्हल-2 एडीएएस, वेंटिलेडिट सीट, स्पोर्ट सीट, प्रीमियम इंटीरियर सारखे अनेक दमदार फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे.
BMW F 450 GS भारतात लाँच! दमदार इंजिन, अॅडव्हेंचर लूक आणि किफायतशीर किंमतीत मिळणार प्रीमियम अनुभव
वाहन निर्मााता कंपनीने अद्याप गाडीच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, आगामी गाडी भारतात मे आणि जून दरम्यान लाँच केली जाण्याची शक्यता आहे.
होंडा त्यांची आगामी गाडी भारतात आयात करणार असून, त्याची एक्स-शोरूम किंमत 70 ते 75 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.






