Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Meta: मेटाच्या आगामी Project Phoenix नावाच्या मिक्स्ड रिॲलिटी डिव्हाईसची माहिती HorizonOS मधील सॉफ्टवेअर फाइल्समधून लीक झाल्याची बातमी आहे. लीक झालेल्या डिझाइननुसार हा डिव्हाईस पारंपरिक जाड VR हेडसेटपेक्षा साध्या चष्म्यासारखा आणि अधिक स्लिम दिसू शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 14, 2026 | 03:07 PM
हात न लावता स्क्रीन कंट्रोल! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Meta Project Phoenix चा फोटो आणि डिझाइन HorizonOS फाइल्समधून लीक झाल्याची माहिती.
  • पारंपरिक VR हेडसेटपेक्षा स्लिम, चष्म्यासारखा लूक असल्याचे दिसते.
  • डिव्हाईसचे वजन 110 ग्रॅमपेक्षा कमी असण्याची शक्यता; अधिक आरामदायी वापरावर भर.
मेटा कंपनीचा नवीन डिव्हाईस येण्याआधीच लीक झाला आहे आणि टेक जगात एकच चर्चा सुरु झाली आहे. The Verge ने दिलेल्या बातमीनुसार, मेटाच्या ‘प्रोजेक्ट फिनिक्स’ नावाच्या नवीन मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटचा फोटो आणि डिझाईन चुकून समोर आलं आहे. कंपनीने HorizonOS मधल्या प्रिस्क्रिप्शन लेन्स सॉफ्टवेअरचं अपडेट केलं होतं. त्याच फाईल्समधून या नवीन चष्म्याचं ॲनिमेशन आणि डिझाईन बाहेर आलं. आता सगळेच या फोटोबद्दल बोलत आहेत.

जाड हेडसेटचा जमाना संपला, आता साध्या चष्म्यासारखा लूक

आतापर्यंत तुम्ही मेटा Quest 3 किंवा Apple Vision Pro बघितले असतील. ते डोक्यावर घातले की खूप जड वाटतात, मोठे दिसतात. तासभर घातले की डोकं दुखायला लागतं. पण फिनिक्स एकदम वेगळा आहे. लीक झालेल्या फोटोत हा हेडसेट अगदी आपण रोज वापरतो त्या चष्म्यासारखा दिसतोय. खूप स्लिम, खूप पातळ. चेहऱ्यावर जाड फोमचा पट्टा नसणार, त्याऐवजी नाकावर टिकणारे छोटे नोज पॅड असणार. त्यामुळे दिवसभर जरी घातला तरी त्रास होणार नाही. याचं वजन फक्त 110 ग्रॅमच्या आत असेल असं बोललं जातं आहे.

डोक्यावरचं ओझं कमी करण्यासाठी मेटाची भारी आयडिया

हेडसेट इतका हलका कसा केला? यासाठी मेटाने एक भन्नाट शक्कल लढवली आहे. Engadget ने सांगितल्यानुसार, यात बॅटरी आणि प्रोसेसर हेडसेटमध्येच नाही दिले. त्यासाठी एक वेगळा छोटा डब्बा दिला आहे, त्याला Compute Puck म्हणतात. हा पॅक एका वायरने चष्म्याला जोडलेला असेल. तुम्ही तो खिशात ठेवू शकता किंवा बेल्टला लावू शकता. त्यामुळे डोक्यावर फक्त चष्मा राहील आणि सगळं वजन खिशात राहील.या पॅकमध्ये क्वालकॉमचा नवीन Snapdragon Reality Elite चिप बसवला जाणार आहे, जो खूप पॉवरफुल असेल.

चष्मा लावणाऱ्यांसाठी खुशखबर

या लीकमधली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ज्यांना डोळ्याला नंबर आहे त्यांच्यासाठी. आतापर्यंत VR हेडसेटमध्ये चष्मा घालून बघणं खूप अवघड होतं.पण फिनिक्समध्ये तुम्हाला तुमच्या नंबरचे लेन्स वेगळे लावता येतील. फर्मवेअरच्या व्हिडिओत दाखवलं आहे की तुम्ही मोबाईलने QR कोड स्कॅन करून तुमच्या लेन्सचं सेटिंग करू शकता. यात कुठलंही रिमोट नाही. चष्म्याच्या दोन्ही बाजूला आणि खाली छोटे सेन्सर्स आणि कॅमेरे दिले आहेत. तुम्ही फक्त हाताने इशारा केला किंवा डोळ्यांनी बघितलं तरी स्क्रीन कंट्रोल होईल. म्हणजे हातात काहीही धरायची गरज नाही.

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!

लाँच कधी होणार?

मेटाची दरवर्षी Meta Connect नावाची मोठी परिषद होते. यंदा ती 24-25 सप्टेंबरला आहे. त्या परिषदेत कंपनी या फिनिक्सची पहिली झलक दाखवू शकते पण हा चष्मा दुकानात विकायला यायला अजून वेळ आहे. Reuters च्या बातमीनुसार हा डिव्हाईस प्रत्यक्ष बाजारात 2027 पर्यंत येईल गुगल आणि Xreal सारख्या कंपन्या पण अशाच प्रकारचे हलके चष्मे बनवत आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी मेटाचं हे पाऊल खूप महत्त्वाचं आहे. जर हा 110 ग्रॅमचा चष्मा खरंच आला तर VR आणि AR ची दुनिया पूर्णपणे बदलून जाईल.

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Web Title: Metas high tech phoenix vr headset to be controlled by eye movements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Marathi News
  • Meta AI
  • Tech News

संबंधित बातम्या

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय
1

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!
2

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!

Ganeshotsav AI Photo Prompts:  बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!
3

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ
4

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.