Old Eyeglasses Reuse Ideas: नंबर बदलल्यानंतर जुना चष्मा कपाटात किंवा ड्रॉवरमध्ये पडून राहतो. तो फेकून देण्याऐवजी त्याच्या आकर्षक फ्रेमचा वापर करून घर सजवण्यासाठी वेगवेगळ्या क्रिएटिव्ह वस्तू तयार करता येतात. यामुळे जुन्या वस्तूचा स्मार्ट पुनर्वापरही होतो आणि घराच्या सजावटीला हटके लूक मिळू शकतो.
Old Eyeglasses Reuse Ideas: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

सगळ्यात सोपा उपाय. चष्म्याची भिंगं हळूवार काढून घ्या. त्याजागेत कुटुंबासोबतचे छोटो फोटो चिकटवा. टेबलवर वेगळी शो पीस तयार होईल. तसेच जर 3-4 जुने चष्मे असतीलतर भिंतीवर एक छोटीशी फोटो गॅलरीच तयार होईल.

ही सजावट करण्यासाठी एक चष्मा नाहीतर, किमान 4-5 चष्मे असावे. सगळ्या फ्रेम्सना भितींवर लावून एक गोल्डन किंवा ब्लॅक कलर मारून टाका. आतमध्ये छोटं चित्र, चांगला सुविचार किंवा रंगीत कागद लावा. त्यामुळे लूकमध्ये बदल होते.

ज्यांना हिरवळ आवडते त्यांच्यासाठी. एखादं छोटं खोटं झाड किंवा वाळलेली पाने घ्या. त्यावर चष्म्याची फ्रेम अशी लावा की जणू खिडकीतून बाग दिसतेय. ही फ्रेम बाल्कनीच्या भिंतीवर किंवा अभ्यासाच्या टेबलवर ठेवा.

एक कानतले सापडते तर दुसरे सापडत नाही, अशी तक्रार नेहमीच मुलींची राहते, मात्र आता तुमचे कानातले एकाच जागीच राहतील. तसेच रुम डेकोरेशन होईल. त्यांच्यासाठी जुन्या फेमच्या काचा काढून टाका.त्याच्यावर जुनं नेटचं कापड किंवा जाळी लावा. आता त्या जाळीमध्ये तुमचे कानातले अडकवून ठेवा. हे ड्रेसिंग टेबलच्या बाजूला टांगून ठेवा.

चष्म्याच्या फ्रेममध्ये मागे कॉर्कचा तुकडा किंवा जाड पुठ्ठा बसवा. आता त्यावर तुम्ही तुमचे महत्त्वाचे कागद, परीक्षेचं टाईम टेबल, छोटे फोटो पिनने लावू शकता. 2 फ्रेम एकत्र लावल्या तर अभ्यासाच्या कोपऱ्याला एक वेगळाच लूक येतो.

मुलं सुट्टीत कंटाळली असतील तर त्यांना जुना चष्मा द्या. आधी त्याचे धारदार भाग काढून घ्या. मग मुलांना सांगा रंगवायला, त्यावर स्टिकर, चमकी, कागदाचे तुकडे लावायला. त्यातून ते स्वतःसाठी एक खेळण्यातला चष्मा किंवा फ्रेम बनवतील. त्यांची क्रिएटिव्हिटी पण वाढेल आणि वेळ पण मस्त जाईल.

काहीच नवीन बनवायचं नसेल तर आहे तसा चष्मा थोडा सजवून शेल्फवर ठेवा. एखादी छोटी रिबन बांधा किंवा थोडा रंग द्या. पुस्तकांच्या बाजूला, फुलदाणीच्या शेजारी ठेवला तर एक विंटेज कॉर्नर तयार होतो. काहीच खर्च न करता घराची शोभा वाढते, हाच तर खरा जुगाड आहे.






