Tech Tips: नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच किती वेळ अन् किती टक्के चार्ज करणं ठरणार योग्य? काय आहे नियम? वाचा सविस्तर
काळानुसार स्मार्टफोन अपग्रेड झाले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन वापरण्याची आणि चार्ज करण्याची पद्धत देखील बदलली आहे. याच कारणामुळे जेव्हा आता तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करता, तेव्हा पहिल्यांदाच 8 ते 10 तास चार्ज करण्याची आवश्यकता नाही. दुसरे कारण म्हणजेच लेटेस्ट आणि ॲडव्हांस स्मार्टफोन्स लिथियम-आयन किंवा लिथियम-पॉलिमर बॅटरीने सुसज्ज असतात. असे स्मार्टफोन्स पहिल्यांदाच दिर्घकाळ चार्ज करण्याची आवश्यकता नसते. (फोटो सौजन्य: Pinterest)
नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तुम्ही त्याला सामान्य पद्धतीने चार्ज करू शकतात. तुम्ही खरेदी केलेल्या स्मार्टफोनची बॅटरी जर 20-30 टक्के असेल, तर तुम्ही हा स्मार्टफोन घरी घेऊन आल्यानंतर कंपनीच्या ओरिजिनल किंवा सर्टिफाइड चार्जरने चार्ज करू शकता. स्मार्टफोनची चार्जिंग 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर चार्जर हटवू शकता. पण लक्षात ठेवा की, स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला 8, 10 किंवा 12 तास चार्ज करण्याची गरज नाही.
जर नवा स्मार्टफोन आधीपासून 40 ते 60 टक्के चार्ज असेल तर त्याला लगेच 100 टक्के चार्ज करण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही तुमच्या गरजेनुसार स्मार्टफोनचा वापर करून नंतर त्याला चार्ज करू शकता.
अनेकजण असा सल्ला देतात की, स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला 100 टक्के चार्ज करावा. पण खरंच असं आहे का? असे म्हटले जाते की बॅटरीच्या टक्केवारीची माहिती सिस्टमशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेण्यासाठी (सिंक करण्यासाठी) फोन अधूनमधून जवळपास 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करणे आवश्यक असते. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करतात. याचा अर्थ असा नाही की, फोन दररोज 100 टक्के चार्ज करणं गरजेचं आहे.






