
टचस्क्रीनच्या युगात QWERTY की-बोर्डचा कमबॅक! Minimal Phone 2 चा लूक पाहताच यूजर्स फीदा, किंमत आणि फीचर्सवर टाका नजर
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 599 डॉलर म्हणजेच सुमारे 58,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन फोन 8GB + 256GB, 8GB + 512GB आणि 12GB + 512GB या तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत $599 म्हणजेच सुमारे 58,000 रुपये, 8GB + 512GB व्हेरिअंटची किंमत $675 म्हणजेच सुमारे 65,000 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत $899 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: X)
कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन फुल QWERTY की-बोर्ड डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. हा किबोर्ड स्क्रीनसह लाँच करण्यात आला आहे. या फोनचा आकार 122.6 x 72 x 9.48 mm आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या फोनमध्ये 3.92-इंच ओएलईडी डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 1080 x 1240 पिक्सेल, रिफ्रेश रेट 90Hz आहे. यासोबतच या नव्या डिव्हाईसच्या समोरील बाजूला 20 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनच्या मागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे.
12 जीबीपर्यंत रॅम आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 8300 चिपसेटसह हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. रोजच्या कामांसाठी हा फोन जबरदस्त परफॉर्मंस ऑफर करतो. यासोबतच कंपनीच्या या नव्या फोनमध्ये 3000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 27W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉईडवर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेस मिनिमल ओएसवर चालतो.
मिनिमलने लाँच केलेल्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.4, एनएफसी, वाय-फाय 6E चा सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. कंपनीच्या या नवीन डिव्हाईसमध्ये डुअल सिम- एक फिजिकल स्लॉट आणि एक ईसिम सपोर्ट देखील दिला आहे. मिनिमलने यामध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील दिला आहे. यासोबतच फोनमध्ये डुअल स्पीकर आणि डुअल माइक्रोफोन देखील देण्यात आले आहे. या फोनच्या यूएसबी टाइप-सी पोर्टमध्ये डिस्प्लेपोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे.