Mivi SuperPods Earbuds: Dolby Audio सपोर्टसह लाँच झाले नवीन ईअरफोन्स, फीचर्सही दमदार! जाणून घ्या किंमत
Mivi ने त्यांचे नवीन ईअरबड्स SuperPods Concerto TWS भारतात लाँच केले आहेत. या ईअरफोन्सची डिझाईन अतिशय युनिक आहे. अगदी पाहता क्षणी कोणीही त्या ईअरबड्सकडे आकर्षित होईल. हे नवीन आणि लेटेस्ट ईअरफोन्स 35dB पर्यंत अॅक्टिव्ह नॉइज कँसिलेशन (ANC) सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. या नवीन ईअरबड्समध्ये 3D साउंडस्टेज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
कंपनीने दावा केला आहे की हे नवीन इयरफोन, केससह, एकूण 60 तासांपर्यंत प्लेटाईम प्लेटाईम ऑफर करतात. हे TWS इयरफोन्स Hi-Res Audio सर्टिफिकेशनसह Dolby Audio आणि LDAC ऑडियो कोडेकला सपोर्ट करतात. SuperPods Concerto हा कंपनीच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. चला तर मग आता Mivi च्या नवीन SuperPods Concerto TWS ईअरबड्सची किंमत, फीचर्स आणि उपलब्धता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Mivi)
भारतात Mivi SuperPods Concerto ची किंमत 3,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे इयरफोन मेटॅलिक ब्लू, मिस्टिक सिल्व्हर, रॉयल शॅम्पेन आणि स्पेस ब्लॅक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. हे फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिवी इंडिया वेबसाइट आणि देशातील निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येतील .
Mivi SuperPods Concerto मध्ये मेटल युनिबॉडी डिझाइन आहे ज्यामध्ये घंटाघर (hourglass) च्या आकाराचा स्टेम आणि ग्लॉसी फिनिश आहे. हे इयरफोन Hi-Res Audio सर्टिफिकेशनसह येतात आणि Dolby Audio तंत्रज्ञानाला समर्थन देतात, जे यूजर्सना थिएटरसारखा अनुभव देण्याचा दावा करते. याशिवाय, ते Mivi च्या 3D साउंडस्टेज साउंड प्रोफाइल तंत्रज्ञानाला देखील सपोर्ट करतात.
Mivi चे नवीन TWS इयरफोन ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी आणि LDAC ऑडिओ कोडेकला सपोर्ट करतात. LDAC कोडेक यूजर्सना लॉसलेस हाय-रिझोल्यूशन ऑडिओ ट्रान्समिशन प्रदान करतो, ज्यामुळे स्पष्ट साउंड एक्सपीरियंस मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये क्वाड-माइक युनिट आहे आणि त्यात Transparency Mode आणि 35dB पर्यंत ANC सह कॉल नॉइज रिडक्शन सारखी फीचर्स देखील समाविष्ट आहेत. हे इयरफोन ड्युअल-डिव्हाइस कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतात.
Mivi SuperPods Concerto केससह एकूण 60 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा करतात. तर, एकदा चार्ज केल्यानंतर इयरफोन 8.5 तासांपर्यंत टिकू शकतात. चार्जिंग केसमध्ये USB टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. असा दावा केला जात आहे की 10 मिनिटे जलद चार्ज केल्याने 8 तासांपेक्षा जास्त प्लेबॅक वेळ मिळेल. केस आणि इअरफोन्सचे एकूण वजन 44 ग्रॅम आहे. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन या इअरबड्सबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. वेबसाईटवर तुम्हाला या नवीन आणि लेटेस्ट ईअरबड्सचे अनेक फोटो पाहायला मिळणार आहेत.