India vs New Zealand: कोण जिंकणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना? AI चॅटबोट्सने दिली आश्चर्यकारक उत्तरं!
9 मार्च रोजी उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक आहे. सामना कोण जिंकणार, याचा प्रत्येकजण वेगवेगळा अंदाज वर्तवत आहे. भारतीय संघाचा प्रत्येक चाहता या सामन्यात टिम इंडियाचा विजय व्हावा, म्हणून प्रार्थना करत आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारतच जिंकणार आहे, असं भाकित देखील अनेकांनी केलं आहे.
चॅटजीपीटी सारख्या वेगवेगळ्या चॅटबॉट्सना देखील प्रश्न विचारण्यात आला होता की यंदाचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना कोण जिंकणार, तेव्हा त्यांनी या सामन्याच्या निकालाबद्दल काय भाकिते केले आहेत याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – ICC)
ओपनएआयच्या चॅटजीपीटी, गुगल जेमिनी आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलट चॅटबॉट्सना विचारण्यात आले की भारत आणि न्यूझीलंडमधील अंतिम सामना कोणता संघ जिंकेल आणि का? या प्रश्नाचं उत्तर देताना, सर्व चॅटबॉट्सनी भारत जिंकेल असे भाकीत केले आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की चॅटबॉट्स पूर्णपणे अचूक उत्तरे देत नाहीत आणि त्यांची उत्तरे चुकीची असू शकतात. पण क्रिकेटतज्ज्ञ आणि चाहते यांच्या भाकितानंतर आता AI चॅटबोट्सने देखील या सामन्यात भारतच जिंकेल असं भाकित केलं आहे.
जेमिनी म्हणाले की अंतिम सामन्यातील विजेता कोण असेल हे सांगणे कठीण आहे आणि दोन्ही संघ मजबूत आहेत, परंतु भारतीय संघ अधिक मजबूत आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीत डेप्थ आहे आणि रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे सामना जिंकवणारे खेळाडू आहेत. जर भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली तर भारत ट्रॉफी जिंकेल.
चॅटजीपीटीने म्हटले आहे की भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकू शकतो. याचे कारण सांगताना ते म्हणाले की, भारतीय संघाचे दुबईमध्ये वर्चस्व आहे आणि त्यांनी यापूर्वीही येथे न्यूझीलंडला पराभूत केले आहे. या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. दुबईची परिस्थिती भारताच्या बाजूने असू शकते. तथापि, त्याने न्यूझीलंडलाही कमी लेखलेले नाही. चॅटजीपीटीने म्हटले आहे की न्यूझीलंड पाच जागतिक स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांची बँलेस्ड टीम आणि फॉर्ममध्ये असलेले विल्यमसन आणि रचिन रवींद्र सारखे खेळाडू एक मजबूत आव्हान उभे करतील. मात्र या सामन्याच्या वेळी दुबईची परिस्थिती भारताच्या बाजूने असू शकते.
मायक्रोसॉफ्ट कोपायलटनेही भारत अंतिम सामना जिंकू शकेल असे भाकीत केले होते. यानुसार, भारतीय संघाची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे आणि ती एक मजबूत संघ आहे. त्यांच्याकडे विराट कोहली आणि शुभमन गिलसारखे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत आणि मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमण आहे. न्यूझीलंड हा एक मजबूत संघ आहे पण विशेषतः आशियाई परिस्थितीत भारताविरुद्ध त्यांना संघर्ष करावा लागला आहे.