
7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका... जाणून घ्या किंमत
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 6 जीबी + 128 जीबी या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन पँटोन अलास्कन ब्लू, पँटोन मालागा आणि पँटोन स्टारगेझर रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. स्मार्टफोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – Motorola)
लाँच ऑफरचा विचार करता, ॲक्सिस आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड्सद्वारे पेमेंट केल्यास या फोनवर 1,000 रुपयांची त्वरित सवलत उपलब्ध आहे. यासोबतच जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 1,000 रुपयांचा बोनस डिस्काउंट देखील मिळणार आहे. या स्मार्टफोनची विक्री 20 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
मोटोरोलाने लाँच केलेल्या लेटेस्ट मोटो जी मॅक्स स्मार्टफोनमध्ये 6.72-इंच (1,080 x 2,400 पिक्सेल) फुल-एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सँपलिंग रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 1,050 निट्सपर्यंत आहे. या फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतात.
मोटोरोलाच्या या फोनमध्ये क्वालकॉमचा 4nm स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे. हा नवा स्मार्टफोन 6GB चे एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 128GB च्या यूएफएस 3.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन रॅम बुस्ट फीचरसह लाँच केला आहे, यामुळे स्मार्टफोनची रॅम 24 जीबीपर्यंत वाढवली जाऊ शकते. फोनमध्ये 30w फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000mAh बॅटरी दिली आहे.
फोटोग्राफीसाठी या नव्या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा सोनी लायटिया 600 लेंस आहे, ज्यासोबत 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. मोटोरोलाचा हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित कंपनीच्या हेलो यूआयवर चालतो, या डिव्हाईससाठी दोन वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि तीन वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळतील.
यूजर्सची प्रतिक्षा संपली! Google Pixel 11 सीरीज भारतात लाँच; वाचा फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये डुअल-सिम 5G, 4G एलटीई, वायफाय 5, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. हा फोन IP64 रेटिंग आणि MIL-STD-810H ड्यूरेबिलिटीसह लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.