Instagram New Logo: इंस्टाग्रामला मिळाली नवी ओळख! कंपनीने 10 वर्षांनी बदलला लोगो; काय म्हणाले यूजर्स?
एडम मोसेरी यांनी म्हटलं आहे की, नवीन वर्डमार्क पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आणि आधुनिक आहे. यामध्ये मूळ डिझाइनचे सार, तसेच इंस्टाग्रामचा साधेपणा आणि कलात्मकता जपली गेली आहे. मेटाच्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, टिमने शेकडो डिझाईन पाहिले आणि त्यावर विचार केला. यामध्ये सर्व-कॅप्स अक्षरांपासून ते हस्तलिखित डिझाईनपर्यंत सर्वांचा समावेश होता. मात्र, अखेरीस टीमने प्रवाही स्ट्रोक असलेल्या स्क्रिप्ट फॉन्टची निवड केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्रामच्या प्रॉडक्ट डिझाइनच्या संचालिका, जस्मिन प्रोब्स्ट यांनी 13 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, स्क्रिप्ट वैयक्तिक ओळख दर्शवते. त्यांनी सांगितलं की, नीवन वर्डमार्क जास्त बोल्ड आणि सरळ आहे, ज्यामध्ये अनपेक्षिततेचा स्पर्श आहे.
View this post on Instagram
इंस्टाग्रामने सुमारे 10 वर्षांनी वर्डमार्क बदलले आहे. नवीन डिझाईन पूर्वीपेक्षा जास्त स्वच्छ आणि मॉडर्न बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असं असलं तरी देखील सोशल मीडियावर लोकांनी इंस्टाग्रामचा नवा लोगो ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही लोकांनी नव्या लोगोलो पसंती दर्शवली आहे मात्र काही यूजर्सनी या नव्या लोगोची खिल्ली उडवण्यास सुरुवात केले आहे.
एका यूजरने मोसेरी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की, नवीन लोकं स्वच्छ आणि मॉडर्न असण्यासोबतच मजेदार देखील आहे. तर दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे की, या वर्डमार्कमध्ये एक चमक आहे. तर काही यूजर्स इंस्टाग्राम वर्डमार्कमधील ‘एस’ आणि ‘आर’ शब्दांमध्ये गोंधळले आहेत. तर आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, हे वर्डमार्क वाचायला फार कठीण आहे.
जर तुम्ही दिर्घकाळापासून इंस्टाग्रामचा वापर करत असाल तर हा बदल तुम्हाला पाहताक्षणी लक्षात येईल. गेल्या एका दशकापासून इंस्टाग्रामचे नाव एक खास कर्सिव म्हणजेच हाताने लिहील्यासारखे भासत होते. मात्र आता इंस्टाग्रामने हीच स्टाईल बदलली आहे. नवीन ‘वर्डमार्क’च्या (शब्द-चिन्हाच्या) रचनेत जुनी वळणदार (कर्सिव्ह) शैली आणि नॉर्मल प्रिंट अक्षरे यांच्यातील समतोल साधणारी रचना दिसून येते.

