Moto G06 Power: मोटो स्मार्टफोनने गाजवलं मार्केट! 50MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स मिळणार केवळ 7,499 रुपयांत
मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Moto G06 Power या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 8 हजार रुपयांहून कमी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन Moto G सीरीज अंतर्गत लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो G81 एक्सट्रीम प्रोसेसरने सुसज्ज आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या संरक्षणासाठी IP64 रेटिंग दिली आहे.
Moto G06 Power हा स्मार्टफोन भारतात एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB बिल्ट-इन स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ 7,499 रुपये आहे. हे डिव्हाईस पॅनटोन लॉरेल ओक, पॅनटोन टेंड्रिल आणि पॅनटोन टेपेस्ट्री या रंगात लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसची विक्री फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया वेबसाइट आणि प्रमुख रिटेल स्टोर्सद्वारे केली जाणार आहे. (फोटो सौजन्य – X)
मोटोरोलाच्या नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर Moto G06 Power मध्ये 6.88-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनची पीक ब्राइटनेस 600 निट्सपर्यंत आहे. यासोबतच या स्मार्टफोनच्या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोनला पावर देण्यासाठी Moto G06 Power मध्ये MediaTek Helio G81 एक्सट्रीम प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याला 4GB रॅमसह 64GB स्टोरेज जोडण्यात आलं आहे. डिव्हाईसचे बिल्ट-इन स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
moto G06 Power Launched in India – 6.88-inch 120Hz Display
– Corning Gorilla Glass 3
– MediaTek G81 Extreme
– 4GB LPDDR4X RAM, 64GB storage
– 50MP Primary Camera
– 8MP Selfie Camera
– Vegan Leather Design
– Colours: PANTONE Tendril, PANTONE Laurel Oak, PANTONE Tapestry… pic.twitter.com/l5TBwALvci — Mukul Sharma (@stufflistings) October 7, 2025
फोटोग्राफीसाठी नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या Moto G06 Power या बजेट स्मार्टफोनमध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये f/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आल आहे. एवढचं नाही तर या स्मार्टफोनमध्ये Google चे Gemini AI असिस्टेंटचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!
Moto G06 Power या डिव्हाईसमध्ये कनेक्टिविटीसाठी 4G LTE, वाय-फाय 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 6.0, GPS, Glonass, Galileo, QZSS आणि USB टाइप-C पोर्ट देण्यात आले आहे. फोनमध्ये 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W चार्जिंगला सपोर्ट आहे.