Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा मालक एलन मस्क ऑनलाइन इनसाइक्लोपीडिया Grokipedia लाँच करण्याची तयारी करत आहे. Grokipedia हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे जगातील लोकप्रिय इनसाइक्लोपीडिया असलेल्या आणि इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म Wikipedia ला टक्कर देणार आहे. Grokipedia मस्कची AI कंपनी xAI वर आधारित असणार आहे, जी सध्या चॅटबॉट Grok AI आणि इतर AI प्रोडक्ट चालवते. Grokipedia च्या नावावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हे चॅटबोट Grok सोबत कनेक्ट असणार आहे. हे इंटरनेट आणि दुसऱ्या सोर्सद्वारे माहिती साठवणार आहे. एलन मस्कने अशी घोषणा केली आहे की, तो लवकरच Grokipedia 1.0 लाँच करणार आहे.
Elon Musk ने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पुष्टी करण्यात आली आहे की, Grokipedia 1.0 लवकरच लाँच केला जाणार आहे. सर्वात आधी या प्लॅटफॉर्मचे बीटा वर्जन लाँच केलं जाणार आहे. त्यांनी Grokipedia बद्दलच्या पोस्टमध्ये नवीन प्लॅटफॉर्मबद्दल काही माहिती शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, Grokipedia माणसं आणि AI साठी जगातील सर्वात मोठा आणि अचूक माहितीचा सोर्स असणार आहे. तसेच याचा वापर करण्यासाठी कोणतीही मर्यादा सेट केली जाणार नाही. एलन मस्क Wikipedia वर वेळोवेळी टीका करत असतो. तसेच त्याने विकिपीडियाच्या नॉन-प्रॉफिट संस्था असण्यावर देखील एक प्रश्न उपस्थित केला आहे. यासोबतच, मस्कने असा देखील आरोप केला आहे की विकिपीडियावरील कंटेंट डाव्या विचारांना प्रतिबिंबित करते.
Why the world needs Grokipedia? ➤ Wikipedia isn’t the neutral source of truth it once was. It’s been taken over by far-left activists and often used as a propaganda tool, not an unbiased encyclopedia. ➤ A lot of AIs today get their info from the internet, but the web is full… pic.twitter.com/nuwQ65diWM — DogeDesigner (@cb_doge) October 4, 2025
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये या संपूर्ण जागाला इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म Grokipedia 1.0 ची गरज का आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. ग्रोकिपीडिया हा एक मुक्त-स्रोत विश्वकोश असेल जो केवळ सत्यावर केंद्रित असेल, असं देखील पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
एलन मस्कचं असं म्हणणं आहे की, इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म Grokipedia 1.0 या महिन्याच्या शेवटी लाँच केलं जाऊ शकतं. अशी शक्यता आहे की, येत्या काही दिवसांत या प्लॅटफॉर्मबाबत अधिक माहिती जारी केली जाऊ शकते. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हे इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म ग्रोक प्रीमियम सबस्क्रिप्शनसह अॅक्सेस करता येते. एलन मस्क म्हणतात की त्यांचे प्लॅटफॉर्म अचूक आणि निःपक्षपाती कंटेंट प्रदान करेल.
विकिपीडिया नक्की आहे तरी काय?
विकिपीडिया एक ऑनलाइन इनसाइक्लोपीडिया आहे.
विकिपीडिया कधी लाँच करण्यात आलं आहे?
2001
विकिपीडिया किती भाषांमध्ये उपलब्ध आहे?
300