
Moto G57 Power: 7,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा... तगड्या फीचर्ससह भारतात नव्या स्मार्टफोनचे आगमन, जाणून घ्या किंमत
Moto G57 Power 5G या स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज हा बेस व्हेरिअंट 14,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. सुरुवातीच्या इंट्रोडक्टरी ऑफर्ससह ग्राहक हा स्मार्टफोन केवळ 12,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत, ज्यामध्ये बँक ऑफर्स आणि एक स्पेशल लाँच डिस्काउंट ऑफर देखील समाविष्ट आहे. या ऑल न्यू डिव्हाईसची विक्री 3 डिसेंबरपासून 12 वाजता फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया ऑनलाइन स्टोर आणि दूसरे रिटेल चॅनलद्वारे केली जाणार आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन पॅनटोन रेगाटा, पैनटोन फ्लूइडिटी आणि पॅनटोन कॉर्सेयर कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
Speed. Clarity. Power. The #motoG57POWER packs Snapdragon 6s Gen 4, a 50MP LYTIA 600 camera with motoAI, and a 7000mAh battery that lasts up to 60 hours. All from ₹12,999*. Sale starts 3 Dec. #Motorola #BeUnstoppable pic.twitter.com/01QqXq9PP7 — Motorola India (@motorolaindia) November 24, 2025
डिव्हाईसच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Moto G57 Power या डिव्हाईसमध्ये 6.72-इंचाचा फुल-HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 120Hz टच सँपलिंग रेट, 1,050 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. यासोबतच फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देखील आहे. हे डिव्हाईस डुअल सिमसह उपलब्ध आहे आणि Android 16 ने सुसज्ज आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले स्मार्ट वॉटर टच 2.0 सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये क्वालकॉमचा ऑक्टा कोर 4nm बेस्ड स्नॅपड्रॅगन 6s Gen 4 चिपसेट दिला आहे. ज्यासोबत 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिलं आहे.
फोटोग्राफीसाठी Moto G57 Power मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-600 प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 119.5-डिग्री फील्ड ऑफ व्यूवाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस आणि एक टू-इन-वन लाइट सेंसर देखील देण्यात आला आहे. समोरील बाजूला या डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. ज्याच्या मदतीने 60 fps पर्यंत 2K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता. याशिवाय, या मोटोरोला डिव्हाइसला 7,000mAh बॅटरी आणि 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.
मोटोरोलाच्या या डिव्हाईसमध्ये अनेक AI-पावर्ड कॅमेरा फीचर्सचा समावेश आहे. फोनमध्ये शॉट ऑप्टिमाइजेशन, ऑटो स्माइल कैप्चर, मैजिक इरेजर, फोटो अनब्लर, रीइमेजिन ऑटो फ्रेम, पोर्ट्रेट ब्लर, पोर्ट्रेट लाइट, स्काई, कलर पॉप आणि सिनेमॅटिक फोटो सारखे अनेक AI फीचर्स उपलब्ध आहेत.
Ans: Motorola दर काही महिन्यांनी Moto G, Edge आणि Razr सिरीजमध्ये नवीन मॉडेल्स लॉन्च करते.
Ans: सर्व Motorola स्मार्टफोनमध्ये जवळपास स्टॉक Android अनुभव असतो.
Ans: होय. बहुतेक मॉडेल्सना नियमित सिक्युरिटी पॅच आणि OS अपडेट मिळतात.