आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर
आतापर्यंत विकेंडला आपल्याला एखादा चित्रपट पाहायचा असेल किंवा आवडता टिव्ही शो पाहायचा असेल आपल्याला गुगलवर सर्च करावे लागत होते. त्यानंतर गुगल सांगायचा की आपले शो आणि चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्ट्रिम केले जात आहेत. त्यानंतर आपल्याला शो किंवा चित्रपट पाहण्यासाठी तो स्पसिफिक अॅप किंवा प्लॅटफॉर्म सर्च करून इंस्टॉल करावा लागत होता. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तुमचा वेळ संपायचा, बरोबर ना! मात्र आता ही संपूर्ण प्रोसेस रद्द करण्यासाठी आता यूजर्सना त्यांचे आवडते शो आणि चित्रपट लवकरात लवकर पाहता यावेत, यासाठी एक नवीन अपडेट जारी केलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलने प्ले स्टोअरसाठी एक नवीन अपडेट जारी केलं आहे. या अपडेटनंतर आता यूजर्सना त्यांचे आवडते शो आणि चित्रपट गुगल प्ले स्टोअरवर सर्ट करता येणार आहेत. त्यानंतर प्ले स्टोअर यूजर्सना सांगणार आहे की, कोणत्या अॅपवर त्यांचा आवडता शो किंवा चित्रपट स्ट्रिम केला जात आहे. या फीचरबाबत गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये माहिती शेअर केली आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, एका नवीन वैशिष्ट्यामुळे आता तुम्ही स्टोअरमध्येच शीर्षके शोधू शकता आणि ते कोणत्या अॅप्सवर स्ट्रीमिंग करत आहेत ते त्वरित पाहू शकता. मूवी नाइटसाठी क्लासिक चित्रपट शोधण्यासाठी किंवा नवीनतम शो पाहण्यासाठी आता तुम्हाला डझनभर अॅप्स स्क्रोल करावे लागणार नाहीत.
जर नवीन फीचर तुमच्या डिव्हाईससाठी रोलआऊट झालं असेल तर तुम्हाला एक Where To Watch कार्ड मिळणार आहे. हे तुम्हाला नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, जिओहॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या चित्रपट किंवा शो पाहण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्सची स्पष्ट यादी त्वरित दाखवेल. याशिवाय तुम्ही संबंधित फ्रीमध्ये पाहू शकता की हा कंटेट पाहण्यासाठी तुम्हाला रेंट किंवा सब्सक्रीप्शन खरेदी करावे लागणार आहे, याबाबत देखील तुम्हाला माहिती दिली जाणार आहे.
Ans: Google Play Store हे अँड्रॉईड डिव्हाइससाठी अधिकृत अॅप मार्केटप्लेस आहे, जिथे अॅप्स, गेम्स, मूव्हीज, बुक्स आणि इतर डिजिटल कंटेंट डाउनलोड करता येतात.
Ans: Play Store उघडा → अॅप सर्च करा → Install वर क्लिक करा.
Ans: Play Protect हे Google चे सिक्युरिटी फीचर आहे जे अॅप्स स्कॅन करून मालवेअरपासून सुरक्षा प्रदान करते.






