Motorola Edge 60: Motorola ने केला धमाका, IFA 2025 मध्ये लाँच केले तीन नवे स्मार्टफोन्स; 7,000mAh बॅटरीने सुसज्ज
Motorola ने IFA 2025 मध्ये तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Edge 60 Neo, Moto G06 आणि Moto G06 Power यांचा समावेश आहे. Motorola Edge 60 Neo मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, लेटेस्ट Moto AI फीचर्स, MIL-STD-810H ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तर Moto G06 Power मध्ये 7,000mAh ची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे.
कंपनीने तिन्ही स्मार्टफोनच्या किंमती आणि विक्रीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. Motorola Edge 60 Neo पँटोन-प्रमाणित फ्रॉस्टबाइट, ग्रिसेल आणि पॉइन्सियाना शेड्समध्ये उपलब्ध आहे. Moto G06 हा पॅन्टोन अरेबेस्क, टेपेस्ट्री आणि टेंड्रिल रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Moto G06 Power पॅन्टोन-प्रमाणित लॉरेल ओक आणि टेपेस्ट्री फिनिशमध्ये सूचीबद्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Motorola Edge 60 Neo मध्ये 6.36-इंच 1.5K (1,200×2,670 पिक्सेल) pOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आहे. यामध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 7400 चिपसेट देखील आहे, जो 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येतो. हा फोन Android 15-बेस्ड Hello UI वर आधारित आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Edge 60 Neo मध्ये 50-मेगापिक्सेल Sony LYTIA 700C प्रायमरी सेंसर (f/1.8 अपर्चर आणि OIS), 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा (120-डिग्री FOV आणि मॅक्रो मोड) आणि 10-मेगापिक्सेल टेलीफोटो लेंस (3x ज़ूम) यांचा समावेश आहे. फ्रंटला 32-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला समर्थन देतात.
Edge 60 Neo मध्ये 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W Turbo चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी डिव्हाईसमध्ये 5G, डुअल 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आले आहे. यात डॉल्बी अॅटमॉस स्टीरिओ स्पीकर्स आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनला MIL-STD 810H मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा आणि IP68/IP69 धूळ आणि पाणी प्रतिरोधक रेटिंग मिळाले आहे.
Moto G06 सीरीजमध्ये 6.88-इंच HD+ (1640×720 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 600 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. दोन्ही हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G81-Extreme प्रोसेसर आहे, ज्यासोबत 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रोएसडी कार्डने स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. हे फोन अँड्रॉइड 15-आधारित हॅलो यूआयवर चालतात.
फोटोग्राफीसाठी Moto G06 सीरीज 50-मेगापिक्सेल मेन रियर कॅमेरा (f/1.8 अपर्चर, 4K वीडियो सपोर्ट) आणि 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा (f/2.0 अपर्चर) सह येतात. बेस Moto G06 मध्ये 5,200mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. तर Moto G06 Power मध्ये 7,000mAh बॅटरी आहे, जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 6.0, GPS, USB Type-C आणि NFC (निवडक प्रदेश) आहेत.