Swiggy Instamart ने केली अॅन्युअल सेलची घोषणा! 10 मिनिटांत मिळणार होम डिलीव्हरी आणि 90 टक्क्यापर्यंत मिळणार डिस्काऊंट
आघाडीच्या ई कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने आगामी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. घरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपर्यंत अनेक वस्तूंवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. भारतात केवळ ई कॉमर्स कंपन्यांनीच नाही तर Swiggy’s Instamart ने देखील आगामी सेलची घोषणा केली आहे.
शनिवारी Swiggy’s Instamart ने त्यांच्या पहिल्या वार्षिक सेलची घोषणा केली आहे. या पहिल्या वार्षिक सेलला Instamart Quick India Movement 2025 सेल असं नावं देण्यात आलं आहे. कंपनीने माहिती दिली आहे की, हे भारतातील ‘क्विकेस्ट सेल’ असणार आहे आणि या सेलमध्ये केवळ 10 मिनिटांत सामानाची डिलीव्हरी केली जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिला वार्षिक सेल 19 सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. या सेलची शेवटची तारीख 28 सप्टेंबर असणार आहे. याच काळात फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने देखील त्यांच्या सेलची घोषणा केली आहे. 23 सप्टेंबरपासून Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, Instamart क्विक इंडिया मूवमेंट 2025 सेलचा कालावधी 10 दिवसांचा असणार आहे. हा सेल 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे आणि 28 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. वापरकर्ते स्विगी अॅप आणि इन्स्टामार्ट अॅप दोन्हीवर ते अॅक्सेस करू शकतील.
कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीच्या या पहिल्या वार्षिक सेलदरम्यान प्लॅटफॉर्मवर 50,000 हून अधिक प्रोडक्ट्सवर ऑफर्स आणि डिल्स उपलब्ध असणार आहेत. काही प्रोडक्ट्सवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जाणार आहे. तर असे देखील काही प्रोडक्ट्स असतील जे ग्राहक 90 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करू शकतात. ग्राहकांना या सेलमध्ये ऑफर्स आणि डील्ससह अनेक प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. डील्स इलेक्ट्रॉनिक्स, किचन आणि डाइनिंग, ब्यूटी आणि पर्सनल केयर, टॉयज आणि अनेक इतर प्रोडक्ट्सवर उपलब्ध असणार आहेत.
Instamart ने त्यांच्या या आगामी सेलसाठी boAt, Philips, Bergner आणि Pampers सारख्या कंपन्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. हा ईव्हेंट एअरविक आणि नेस्टासिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. विशेष म्हणजे अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास, ग्राहकांना 10 टक्के त्वरित सूट देखील मिळेल, ज्याची मर्यादा 1,000 रुपयांपर्यंत असेल.
कंपनीने सांगितलं आहे की, सेलमध्ये नवीन प्रोडक्ट्स लाँच देखील असणार आहे, ज्यामध्ये सर्वात मोठं नाव iPhone 17 चं आहे. ही Apple ची आगामी सिरीज आहे, जी 9 सप्टेंबर रोजी लाँच केली जाणार आहे. यानंतर काही दिवसांतच या सिरीजमधील मॉडेलची विक्री सुरु होऊ शकते. स्विगी इन्स्टामार्ट बंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद सारख्या शहरांमध्ये फक्त 10 मिनिटांत हा फोन पोहोचवण्याचा दावा करत आहे. त्यामुळे ग्राहकांना लेटेस्ट लाँच आयफोनची डिलीव्हरी केवळ 10 मिनिटांत मिळणार आहे. याशिवाय कंपनीच्या या आगामी सेलमध्ये वनप्लस आणि ओप्पो स्मार्टफोन्ससोबतच, जेबीएल, फिलिप्स, पोर्ट्रॉनिक्स, अंब्रेन, नॉईज, डबस्टेप, एव्हरेडी आणि लाईफलाँग सारख्या ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवरही मोठ्या सवलती मिळतील.