
उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स... पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी
कंपनीने त्यांचा पहिला फोल्ड स्मार्टफोन भारतात 12GB + 256GB आणि 16GB + 512GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 12GB + 256GB बेस व्हेरिअंटची किंमत 1,49,999 रुपये आहे. तर 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे एक फिफा विश्वचषक 26 कलेक्शन देखील सादर केले आहे. ज्याची किंमत 1,69,999 रुपयांपासून सुरु होते. (फोटो सौजन्य – Motorola)
कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील देत आहे, जिथे ग्राहकांना बचतीसह नवा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना डिव्हाईसच्या खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंत इंस्टंट बँक डिस्काउंट ऑफर केले जात आहे. यासोबतच या स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्सचेंज बोनस देखील दिला जाणार आहे. काही निवडक बँक कार्डांसह पेमेंट केल्यास ग्राहकांना 18 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील मिळणार आहे. पॅन्टोन ब्लॅकन्ड ब्लू आणि पॅन्टोन लिली व्हाइट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि देशातील निवडक रिटेल्स स्टोअर्सवरून स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो.
The flawless fold is here to change what foldables can do. Pre-order the motorola razr fold now at ₹99,999* or ₹5,556* per month Sale starts 20th May on Flipkart, https://t.co/azcEfy2uaW and leading retail stores.#motorolarazrfold #unfoldflawless pic.twitter.com/CsoFSLsABm — Motorola India (@motorolaindia) May 13, 2026
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. मोटोरोला रेझर फोल्डमध्ये 6.6-इंच एलटीपीओ pOLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करतो. यासोबतच यामध्ये 6,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. डिव्हाईसमध्ये 8.1-इंच इनर LTPO pOLED डिस्प्ले दिला आहे. याचे रिजॉल्यूशन 2K आणि रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. डिस्प्ले 6,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि अल्ट्रा थिन ग्लास (UTG) प्रोटेक्शन ऑफर करते. फोनमध्ये अँड्रॉईड 16 पर बेस्ड My UX दिले आहे. यामध्ये 7 अँड्रॉईड ओएस अपग्रेड आणि 7 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे.
फोल्डेबल डिव्हाईस आणखी पावरफुल व्हावा यासाठी यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट दिला आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये एड्रेनो A829 जीपीयू, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे. या सर्वांमुळे कंपनीचा पहिला फोल्ड फोन आणखी पावरफुल बनतो.
फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. यासोबतच फोनमध्ये 1/1.28-इंच सोनी LYTIA प्रायमरी सेंसरवाला 50-मेगापिक्सेल कॅमेरा मिळणार आहे. नवीन डिव्हाईस 3x ऑप्टिकल झूमवाला 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस देखील ऑफर करत आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. इनर डिस्प्लेवर 20-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या मागील कॅमेऱ्यांमध्ये 30fps वर 8K आणि 60fps वर 4K पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे.
फोल्ड फोनमध्ये 80W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली आहे.
Ans: Motorola ही अमेरिकन टेक कंपनी आहे.
Ans: हो, Motorola चे स्मार्टफोन भारतात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
Ans: Motorola Razr सिरीज कंपनीच्या लोकप्रिय फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये गणली जाते.