Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत... प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
अखेर Android 17 वरून पडदा उठला! लवकरच बदलणार यूजर्सचा अनुभव… धाकड फीचर्स ठरणार गेमचेंजर
सध्या गेममध्ये सुरू असलेल्या चिजल ड्रीम थीम बुयाह पास ईव्हेंट प्रचंड चर्चेत आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेयर्सना एक्सक्लुसिव बंडल्स, ग्रेनेड स्किन आणि सुफरबोर्ड रिवॉर्ड्स स्वरूपात जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट गेममध्ये मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
या ईव्हेंटमध्ये अंडरवॉटर थीमवर आधारित अनेक कॉस्मेटिक आयटम्स आणि धमाकेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स अनलॉक करण्यासाठी प्लेअर्सना काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. हा ईव्हेंट गेममध्ये सुरु झाला असून पुढील काही आठवड्यांसाठी अॅक्टिव्ह राहणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये येत्या दोन दिवसांत MP5 x पॅराफल रिंग ईव्हेंट देखील सुरु होणार आहे. या ईव्हेंटमध्ये दुर्मिळ इनक्यूबेटर वेपन स्किन्सची पुन्हा एकदा एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना लेजेंडरी MP5 आणि पराफल स्किन्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ईव्हेंट 17 मे 2026 पासून गेममध्ये सुरु होणार आहे.
गेममधील आणखी एक ईव्हेंट म्हणजे इमोट रॉयल ईव्हेंट. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना नवीन स्विटन अप ईमोट जिंकण्याची संधी मिळणार आहे. ज्या प्लेअर्सना दुर्मिळ ईमोट्स गोळा करण्याची आवड आहे, अशा प्लेअर्सची या ईव्हेंटला पसंती मिळत आहे.
या सर्व ईव्हेंट्ससोबतच गेममध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट देखील अॅक्टिव्ह आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना स्पेशल फिस्ट स्किन्स, हॉर्स स्किन्स आणि प्रिमियम कॉस्मेटिक आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा ईव्हेंट मर्यादित काळासाठी सुरु राहणार असल्याने लवकरात लवकर यामध्ये सहभागी व्हा.
फ्री फायर मॅक्समधील काही ईव्हेंट 7 दिवसांसाठी सुरु असतात तर काही ईव्हेंट्स संपूर्ण महिना भरासाठी सुरु असतात. फ्री फायर मॅक्समध्ये नवीन ईव्हेंट्ससोबतच रिडीम कोड्स देखील जारी केले जातात. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळते. हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे प्लेअर्सना लवकरात लवकर कोड्स रिडीम करावे लागतात.






