Mumbai Tech Week च्या तारखा जाहीर, या दिवशी होणार आशियातील सर्वात मोठा AI ईव्हेंट! वाचा वेळापत्रक
येत्या काही दिवसांताच AI क्षेत्रात मोठी खळबळ उडणार आहे, कारण आशियातील सर्वात मोठा AI ईव्हेंट आता आयोजित केला जाणार आहे. या AI ईव्हेंटच्या तारखा आणि वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशियातील सर्वात मोठ्या AI ईव्हेंटबाबत माहिती दिली आहे. याबाबत सरकारच्या एक्स अकाऊंटवर देखील माहिती शेअर करण्यात आली आहे. या AI ईव्हेंटमध्ये अनेक मोठे नेते, अभिनेते, खेळाडू यासंह अनेक दिग्गज उपस्थिती लावणार आहेत. या AI ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून भविष्यात AI क्षेत्रात भारत अव्वल स्थान गाठू शकेल.
5G पावरसह Samsung ने लाँच केला अफोर्डेबल स्मार्टफोन! 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि बरंच काही…
आशियातील सर्वात मोठा AI कार्यक्रम देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 वर्षीच्या मुंबई टेक वीकच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हा AI ईव्हेंट आठवडाभर सुरु राहणार आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा AI ईव्हेंट 1 मार्चला संपणार आहे. आठवडाभर असणाऱ्या या AI ईव्हेंटमध्ये अनेक नवीन आणि प्रसिद्ध चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Mumbai Tech Week कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान, मुंबईच्या वेगवेगळ्या भागात अनेक कार्यशाळा, हॅकेथॉन आणि इंटरेक्टिव सेशन आयोजित केली जातील, तर 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक प्रमुख परिषद आयोजित केली जाईल. त्यात भाषणे आणि पॅनेल चर्चा इत्यादी पाहायला मिळतील. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या टेक एंटरप्रेन्योर असोसिएशनशी हातमिळवणी केली आहे. या कार्यक्रमासाठी तिकिटांच्या तीन श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी तिकिटाची किंमत 1,499 रुपये आहे. प्रो कॅटेगरीच्या तिकिटासाठी 9,999 रुपये आणि VIP तिकिटासाठी 19,999 रुपये द्यावे लागतील.
मुंबई टेक वीक २०२५ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी घोषणा केली. @mumbai_tech_ सोबत झालेल्या बैठकीत त्यांनी मुंबईच्या तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली.
#MumbaiTechWeek pic.twitter.com/GNanCjqIaF — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 12, 2025
वक्त्यांच्या यादीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर, रिलायन्स जिओचे अध्यक्ष अनंत अंबानी, एनएसईचे एमडी आशिष चौहान, सेल्सफोर्सच्या सीईओ अरुंधती भट्टाचार्य, जिओस्टारचे उपाध्यक्ष उदय शंकर यांच्यासह अनेक मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय राहुल द्रविड, सुनील शेट्टी, करण जोहर, श्रीराम नेने आणि राज शमानी यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.
यावेळी या कार्यक्रमाचे लक्ष AI टेक्नोलॉजीचा व्यावसायिक वापर, स्टार्टअप्ससाठी नवीन संधी, भारतातील AI रिसर्च आणि उद्योजकांसाठी रोजगार निर्मिती यावर असणार आहे. या कार्यक्रमात सर्व उद्योजक, संशोधक आणि तंत्रज्ञांनी सहभागी व्हावे असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे. हा ईव्हेंट भारताच्या AI ईव्हेंटसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या ईव्हेंटमध्ये भारताच्या AI क्षेत्राचे भविष्य ठरणार आहे.