5G पावरसह Samsung ने लाँच केला अफोर्डेबल स्मार्टफोन! 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि बरंच काही...
Samsung हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे. Samsung नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन गॅझेट्स आणि डिव्हाईस लाँच करत असतो. Samsung ने आतापर्यंत बजेट फ्रेंडली किंमतीपासून प्रिमियम रेंजपर्यंत अनेक आकर्षक गॅझेट्स आणि डिव्हाईस लाँच केले आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकासाठी Samsung अतिशय खास ठरतो. आता देखील कंपनीने एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे.
Samsung ने भारतात आपला नवीन अफोर्डेबल 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट फ्रेंजली रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. Samsung Galaxy F06 5G असं या नवीन अफोर्डेबल 5G स्मार्टफोनचं नाव आहे. Samsung चा हा नवीन स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या स्मार्टफोनसाठी कंपनी 4 वर्षांसाठी अँड्रॉइड ओएस अपडेट्स देईल. या सॅमसंग फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला तर मग या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy F06 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB RAM + 128GB आणि 6GB RAM + 128GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 10,999 रुपये आहे. 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे, तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 11,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
सुरुवातीच्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या सॅमसंग फोनवर 500 रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक देखील दिला जात आहे. हा फोन Bahama Blue आणि Lit Violet या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि फ्लिपकार्ट, सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअर आणि प्रमुख ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल.
सॅमसंगचा हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टसह येतो. यात 6.7-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 800 निट्स आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 SoC आहे, जो 6GB RAM आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
या फोनच्या परफॉर्मेंसबद्दल, कंपनीचा दावा आहे की त्याने AnTuTu बेंचमार्कवर 416,000 पर्यंत गुण मिळवले आहेत. हे अँड्रॉइड 15 वर आधारित कंपनीच्या कस्टम स्किन, One UI 7.0 वर चालते. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स अगदी दमदार आहेत.
Samsung Galaxy F06 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP आहे, त्यासोबत 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
सॅमसंगच्या या बजेट फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. हा फोन उत्कृष्ट 5जी कनेक्टिव्हिटीसाठी 12 5G बँडला सपोर्ट करतो.
सॅमसंग गॅलेक्सी F06 5G स्मार्टफोनमध्ये सॅमसंग नॉक्स व्हॉल्ट, व्हॉइस फोकस आणि क्विक शेअर सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या फोनच्या बॅक पॅनलमध्ये रिपल ग्लो डिझाइन देण्यात आले आहे. यासोबतच फोनच्या पॉवर बटणात फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.