NASA च्या चंद्र मोहिमेत अडचण! अंतराळात Microsoft Outlook ने दिला दगा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
फक्त टेक्स्ट लिहा आणि व्हिडिओ तयार करा! Google चे यूजर्ससाठी खास गिफ्ट, नवे अपडेट ठरणार फायदेशीर
Artemis II हे एक असे मिशन आहे ज्यावर नासाने कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे. या मिशन अंतर्गत 4 अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यात आले आहे. Artemis II 1 एप्रिल 2026 रोजी यशस्वीरित्या लाँच करण्यात आले. यानंतर जेव्हा यात्रा सुरू झाली तेव्हा अंतकाळीविरांना एक मोठा झटका लागला कारण त्यांना आउट लुकचा वापर करण्यात समस्या येत होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित झाल्यानंतर काही तासांत, आर्टेमिस II चे कमांडर रीड वाईजमन यांनी शटलच्या पर्सनल कॉम्प्युटिंग डिव्हाइसेसवर (PCDs) आउटलुक चालत नसल्याच्या दोन घटनांची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, वाईजमन यांनी वापरलेले PCD डिव्हाइस मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो होते. त्या अंतराळवीराने पृथ्वीवरील ह्यूस्टन येथील मिशन कंट्रोलकडून दूरस्थ मदतीची विनंती केली. रीड वाईजमन यांनी सांगितलं की, “माझ्या लक्षात आले आहे की माझ्याकडे दोन मायक्रोसॉफ्ट आउटलुक आहेत आणि त्यापैकी एकही काम करत नाही. त्यामुळे तुम्ही रिमोटली कनेक्ट करून ऑप्टिमस आणि दोन्ही आउटलुक तपासू शकलात तर उत्तम होईल.”
ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यांनतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी यावर मिम्स शेअर करण्यास सुरुवात केली. एका यूजरने नेटफ्लिक्स शो स्पेस फोर्समधील एक क्लिप शेअर केले होते, ज्यामध्ये मिशन कंट्रोलमधील संगणक आपोआप विंडोज अपडेट्स सुरू करतो आणि अंतराळातील मिशन थांबते. तर दुसऱ्या यूजरने लिहीलं आहे, मायक्रोसॉफ्टचे प्रोड्क्टस इतके खराब आहेत की, त्यांनी स्पेस फोर्समधील दृष्ट सत्यात उतरवले आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं आहे की, नासाने इतक्या महत्त्वाच्या मिशनसाठी आऊटलूकवर विश्वास नव्हता ठेवला पाहिजे. अवकाशात आउटलुक वापरणे विचित्र आहे. यापेक्षा स्पेससूट घातलेली कबुतरे अधिक विश्वासार्ह ठरतील.






