देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर ग्राहक केवळ 7,399 रुपयांत हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. मात्र, ग्राहक 400 रुपयांच्या कूपन सवलतीसह हे लावा हँडसेट आणखी स्वस्तात खरेदी करू शकतात. इतकेच नाही, तर तुम्ही फोनचे दोन युनिट्स खरेदी केल्यास तुम्हाला 500 रुपयांची सवलत देखील मिळणार आहे. Lava Bold N2 Lite ची विक्री 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अॅमेझॉनवर सुरु होणार आहे. कोलर गोल्ड आणि निलगिरी ब्लू अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपल्बध आहे. (फोटो सौजन्य – X)
Be Fearless. Be Bold.
The all new Bold N2 Lite is here. Special Launch Price: 6,999*
Sale Starts: 10th April, 12 PM
Notify Me: https://t.co/160yRwJNl0 Here’s a sneak peek of what to expect: ✅ 3GB+3GB** RAM l 64GB ROM
✅ Octa Core Processor
✅ 17.13cm (6.75″) HD+ display
✅… pic.twitter.com/4x5n3aaUrZ — Lava Mobiles (@LavaMobile) April 1, 2026
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झाल तर, Lava Bold N2 Lite मध्ये 6.75-इंच HD+ नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc 9863A चिपसेट देखील दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3GB पर्यंत रॅम आणि 64GB चे इंटरनल स्टोरेज देखील दिले आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे डिव्हाइसचे स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी लावाच्या या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह 13-मेगापिक्सेलचा AI डुअल कॅमेरा दिला आहे. डिव्हाईसमध्ये समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 4.2 आणि एक USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 10W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.






