
तब्बल 40 दिवस चालणार बॅटरी अन् रिवर्स चार्जिंग सपोर्ट... Nokia चा नवा फीचर फोन लाँच! किंमत फक्त 4 हजारांहून कमी
टेक कंपनीने त्यांतचा नवीन फीचर फोन फिलीपीन्समध्ये लाँच केला असून, सध्या हा स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये स्टेंडस्टोन, ग्रीन आणि ब्लॅक यांचा समावेश आहे. या फीचर फोनची किंमत 2,190 फिलीपीन पेसो म्हणजेच सुमारे 3400 रुपये आहे. हा स्मार्टफोन इतर कोणत्या देशात आणि कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती कंपनीने शेअर केली नाही. हा स्मार्टफोन कंपनीच्या ग्लोबल वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. त्यामुळे हा फीचर फोन इतर देशांत देखील लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (फोटो सौजन्य: HMD)
नव्या नोकिआ फीचर फोनमध्ये 3,700mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये चार्जिंगसाठी यूएसबी-सी पोर्ट देण्यात आला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा नोकिआ फोन एका सिंगल चार्जवर 40 दिवसांचा स्टँडबाय टाईम आणि 37 तासांचा कॉन्टिनूअस टॉक टाइम सपोर्ट ऑफर करतो. नोकिआच्या या फोनच्या बाजूला आउट बटन दिले आहे. फीचर फोनमध्ये दिलेले हे स्विच प्रेस केल्यानंतर फोन 10W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. हा नोकिआ फोन ड्यूरेबल रग्ड फीचरसह नोकिआ 123 शिल्डसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या नव्या फीचर फोनचे वजन 138 ग्रॅम आहे, याचा आकार 136.6 x 55 x 14.94mm आहे. या नोकिआ फोनमध्ये 2.4-इंच एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे, ज्याचे रेजोल्यूशन 320 x 240 आहे. हा फोन युनिसॉक SC6531E प्रोसेसर आणि 4MB रॅमसह मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. नोकिया 300 चार्ज फोन S30+ सिंबियन ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित आहे.
कनेक्टिविटीसाठी कंपनीचा या नवीन फीचर फोन 900MHz आणि 1800MHz बँडवर 2G नेटवर्कला सपोर्ट करतो. नोकिआच्या जुन्या फोन्समध्ये देखील अशीच कनेक्टिविटी मिळते. यासोबतच फोनमध्ये चार्जिंगसाठी USB-C पोर्ट देखील देण्यात आला आहे.