या दमदार प्रोसेसरसह लाँच होणार Nothing Phone 3 स्मार्टफोन, इतर स्पेसिफिकेशन्सही आले समोर
टेक कंपनी Nothing चा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँच डेटची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत देखील माहिती दिली आहे. आता या आगामी स्मार्टफोनच्या प्रोसेसरबाबत माहिती समोर आली आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर दिला जाणार याबाबत सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत आहेत. याशिवाय कंपनीने देखील याबाबत माहिती दिली आहे.
Nothing Phone 3 स्मार्टफोन भारतात जुलै महिन्यात लाँच केला जाणार आहे. लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. कंपनीने आगामी स्मार्टफोनच्या प्रोसेसरबाबत माहिती शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नथिंगचा हा फ्लॅगशिप फोन क्वालकॉमच्या चिपसेटसह लाँच केला जाणार आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये पेरिस्कोप टेलीफोटो शूटर दिला जाणार आहे. या स्मार्टफोनसोबत कंपनीने नवीन हेडफोन देखील लाँच करणार असल्याचं सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
🚨NOTHING PHONE (3) TEASED🚨
SD 8S GEN4 ✅
ESSENTIAL KEY✅
METAL FRAME ✅
ANTI REFLECTIVE SCREEN ❌#NOTHING #nothingphone3 pic.twitter.com/z4eKh1JQPG— RØY (@lokakshithroy) June 17, 2025
Nothing Phone 3 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 8s Gen 4 SoC दिला जाणार आहे. Nothing चे सीईओ कार्ल पेई यांनी सांगितलं आहे की, Nothing Phone 2 च्या तुलनेत नवीन स्मार्टफोनमधील प्रोसेसरचा परफॉर्मेंस 36 टक्के अधिक चांगला असणार आहे. नथिंग फोन 2 मध्ये कंपनीने Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट दिला होता. कार्ल पेई यांनी दावा केला आहे की GPU चा परफॉर्मेंस 88 टक्क्यांनी आणि NPU चा परफॉर्मेंस 60 टक्क्यांनी सुधारेल.
Nothing Phone 3 मध्ये 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. हा कॅमेरा सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) ला सपोर्ट करण्याची शक्यता आहे. कॅमेरा मॉड्यूलमध्ये पेरिस्कोपिक टेलिफोटो शूटर लेन्स देखील दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देऊ शकते. या फोनमध्ये Glyph Interface दिला जाणार नाही.
पावरफुल बॅटरीसह लवकरच लाँच होणार Poco चा नवीन स्मार्टफोन, किती असणार किंमत? जाणून घ्या
Nothing Phone 3 बाबत असा दावा केला जात आहे की हा स्मार्टफोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 799 डॉलर म्हणजेच सुमारे 68,000 रुपये असू शकते.