पावरफुल बॅटरीसह लवकरच लाँच होणार Poco चा नवीन स्मार्टफोन, किती असणार किंमत? जाणून घ्या
टेक कंपनी पोकोचा नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार आहे. हा नवीन स्मार्टफोन पॉपुलर F-सीरीज अंतर्गत लाँच केला जाणार आहे. हा डिव्हाईस लवकरच भारतात लाँच होणार आहे. या फोनचे सर्वात महत्त्वाचे हायलाईट म्हणजे या स्मार्टफोनची बॅटरी लाईफ असणार आहे. खरं तर कंपनी आता लवकरच Poco F7 लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचा टिझर फ्लिपकार्टवर शेअर करण्यात आला आहे. हा फोन लवकरच लाँच केला जाणार आहे. मात्र लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे काही फीचर्स ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उघड झाले आहेत.
कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या लाँच डेटबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, येत्या काही दिवसांताच या स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. स्मार्टफोनच्या टिझरवरून हे कंफर्म झालं आहे की, पोको F7 एका मोठ्या बॅटरीसह लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,550mAh बॅटरी असणार आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, या फोनमध्ये आतापर्यंतच्या स्मार्टफोनमध्ये दिसणारी सर्वात मोठी बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत. (फोटो सौजन्य – X)
फ्लिपकार्टवरील फोनच्या लिस्टिंगवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, या डिव्हाइसमध्ये अशी बॅटरी असेल जी नियमित वापरासह एकदा चार्ज केल्यास दोन दिवसांपेक्षा जास्त बॅटरी बॅकअप देईल. त्यामुळे युजर्स दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकणार आहेत. पोकोचा दावा आहे की डिव्हाइसमध्ये वापरल्या जाणाऱ्या सिलिकॉन-कार्बन (Si/C) बॅटरी तंत्रज्ञानामुळे एकदा पूर्ण चार्ज केल्यास हे डिव्हाइस 2.18 दिवसांपर्यंत टिकेल. त्यामुळे जे युजर्स स्मार्टफोनच्या बॅटरीच्या समस्येमुळे चिंतेत असतात अशा युजर्ससाठी हा स्मार्टफोन अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
Poco F7 ची बॅटरी iQOO Z10 आणि Vivo T4 पेक्षा मोठी असणार आहे. iQOO च्या या डिव्हाईसमध्ये 7,300mAh बॅटरी दिली जाणार आहे. जर पोकोने त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 7,550mAh बॅटरी दिली. तर हा स्मार्टफोन देशातील सर्वात मोठ्या बॅटरीसह येणारा स्मार्टफोन असणार आहे. कंपनीने अद्याप स्मार्टफोनच्या डिव्हाईसबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु ब्रँड डिव्हाइसला जास्त जड न बनवता त्याची जाडी आणि डिझाइन कशी मॅनेज केली जाणार आहे, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?
Poco F7 मध्ये Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. गीकबेंच लिस्टिंगमधून असे दिसून आले आहे की डिव्हाइसच्या किमान एका प्रकारात 12GB रॅम आणि हा नवीन चिपसेट असू शकतो.
Poco F6 आणि F5 हे दोन्ही फोन भारतात 29,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते. या नवीन फोनची किंमत देखील 30,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.