Donald Trump ने लाँच केला मेड इन अमेरिका स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि AI फेस अनलॉक फीचरने सुसज्ज! इतकी आहे किंमत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच चर्चेत असतात. कधी युद्धामुळे तर कधी एलन मस्कच्या भेटीमुळे, ट्र्म्प यांची चर्चा नेहमीच सर्वत्र सुरु असते. आता डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या ट्रम्प त्यांच्या नव्या स्मार्टफोन लाँचिगमुळे चर्चेत आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता टेलीकॉम्युनिकेशन क्षेत्रात पदार्पण केले आहे. ट्रम्प यांच्या लेटेस्ट कंपनी Trump Mobile ने T1 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा मेड इन अमेरिका स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचे प्रोडक्शन अमेरिकेत होणार आहे.
6000mAh बॅटरीसह Realme Narzo 80 Lite 5G लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी; असे आहेत फीचर्स
अशी देखील माहिती समोर आली आहे की, न्यूयॉर्कच्या ट्रम्प टॉवरमध्ये डोनाल्ड ट्रम्प जूनियर आणि एरिक ट्रम्पने एक नवीन कंपनी लाँच केली आहे. ट्रंपची ही कंपनी अमेरिकेची प्रमुख टेलीकॉम ऑपरेटर्स म्हणून काम करणार आहे. ट्रम्पने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनची किंमत काय आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
डोनाल्ड ट्रम्पची कंपनी Trump Mobile ने T1 Phone हा स्मार्टफोन लाँच केला आहे. गोल्ड कलरचा हा स्मार्टफोन अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या स्मार्टफोनची किंमत 499 डॉलर म्हणजेच सुमारे 42,893 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 100 डॉलरच्या डाउनपेमेंटसह ऑगस्ट महिन्यात खरेदी केला जाऊ शकतो.
Trump Mobile च्या T1 Phone फोनमध्ये 6.8-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा डिस्प्ले AMOLED पॅनलने सुसज्ज आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, ज्यासोबत 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
JUST ANNOUNCED: Eric Trump and Donald Trump Jr. and Trump Organization has announced an affordable $499 smartphone and mobile phone plan.
Move over “T-Mobile”, here comes TRUMP MOBILE!
MADE IN THE USA 🇺🇸
Who is signing up? pic.twitter.com/4U0p7aeyL5
— Ape𝕏 (@CubanOnlyTrump) June 16, 2025
यासोबतच फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. Trump Mobile चा हा पहिला फोन Android 15 वर आधारित असणार आहे. या फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB एक्सपेंडेबल स्टोरेज देण्यात आलं आहे. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉकचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही
Trump Mobile ‘डिजाइन्ड एंड बिल्ट इन द यूनाइटेड स्टेट’ या टॅगसह त्यांचा पहिला स्मार्टफोन T1 ची मार्केटिंग करत आहेत. या फोनद्वारे कंपनी परदेशी ब्रँडचा पर्याय शोधणाऱ्यांना लक्ष्य करू इच्छिते. अमेरिकेत दरवर्षी 60 दशलक्ष स्मार्टफोन खरेदी केले जातात. विशेष म्हणजे, हे जवळजवळ सर्व स्मार्टफोन अमेरिकेबाहेर तयार केले जातात. पण आता ट्रम्प मोबाईलने तयार केलेल्या मेड इन अमेरिका स्मार्टफोनमुळे युजर्सना एक नवीन पर्याय मिळणार आहे.