Google चा मोठा निर्णय! Gmail चा पासवर्ड रिसेट करताना आता नाही येणार SMS, 'ही' असेल नवीन कोड सिस्टम
असा क्वचितच एखादा व्यक्ति तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याला जिमेलबद्दल माहिती नसेल. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात जिमलेचा वापर केला जातो. शाळा, कॉलेज, कॉर्पोरेट ऑफीस सर्वच ठिकाणी आपल्याला जिमेलची आवश्यकता असते. खरं तर प्रोफेशनल संभाषणासाठी जिमेलचा वापर केला जातो. शिवाय आपण एखादा अॅप डाऊनलोड केला किंवा एखाद्या वेबसाईटला भेट दिली तर अशावेळी आपल्याला आपला जिमेल लॉगिन करावा लागतो. पण आपल्यासोबत अनेकदा असं घडतं की आपण आपला जिमेल तर लॉगिन करतो पण जेव्हा पासवर्ड टाकण्याची वेळ येते, तेव्हा डोक्याला हात लावतो.
आपल्यापैकी 90 टक्के लोक असे आहेत, ज्यांना त्यांच्या जिमेलचा पासवर्डच लक्षात नाही. त्यामुळे जेव्हाही जिमेल लॉगिन करण्याची वेळ येते, फॉरगॉट पासवर्ड करून आपण ओटीपीच्या मदतीने जिमेल लॉगिन करतो. पासवर्ड लक्षात ठेवण्यापेक्षा ही पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्ही देखील तुमचा जिमेल लॉगिन करताना हीच पद्धत वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. आता गुगलने निर्णय घेतला आहे की, ओटीपी कोड पद्धत आता बंद केली जाणार आहे. आता जिमेलचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी ओटीपी नाही तर QR कोड बेस्ड वेरिफाय सिस्टमचा वापर केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आतापर्यंत जिमेल लॉगिन करताना SMS व्दारे 6 अंकी कोड पाठवला जात होता. पण हा कोड सुरक्षित नसून यामुळे फिशिंग आणि सिम-स्वॅपिंगसारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे आता ही कोड सिस्टम बंद केली जाणार असून आता युजर्सना क्यूआर कोड पाठवला जाणार आहे. ही नवीन सिस्टम कधीपासून सुरु केली जाणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र या नव्या सिस्टममुळे युजर्सची सुरक्षा वाढू शकते आणि त्यांचे हॅकर्सपासून रक्षण होऊ शकते.
Gmail चे प्रवक्ता रॉस रिचेन्डरफरने या नव्या क्यूआर कोड सिस्टमची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, आता युजर्सना त्यांच्या स्क्रीनवर कोड दिसण्याऐवजी एक QR कोड दिसणार आहे. हा QR कोड स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने स्कॅन कारावा लागणार आहे. ज्यामुळे इथे तुम्हाला कोणताही ओटीपीची गरज भासणार नाही. यामुळे युजर्सची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे.
Lenovo चा नवीन लॅपटॉप भारतात लाँच, AI फीचर्सने सुसज्ज! तब्बल इतकी आहे किंमत
आतापर्यंत गूगल SMS च्या मदतीने यूजर्सचे अकाऊंट व्हेरिफाय करत होता. पण या संपूर्ण प्रक्रियेत अनेक अडचणी येत होत्या. मात्र आता असं होणार नाही. आता QR कोडच्या मदतीने यूजर्सचे अकाऊंट व्हेरिफाय केलं जाणार आहे. ज्यामुळे हॅकर्स आणि स्कॅमर्सच्या अटॅकपासून युजर्सचं रक्षण होणार आहे. अनेक अशा घटना समोर आल्या होत्या, ज्यामध्ये SMS बेस्ड वेरिफिकेशनचा वापर करून हॅकर्सनी युजर्सचे जिमेल अकाऊंट हॅक केलं होतं. त्यामुळे याच सर्व घटना लक्षात घेऊन आता कंपनीने SMS बेस्ड वेरिफिकेशन बंद करण्याचा निर्णय घेतला असून QR कोडच्या मदतीने यूजर्सचे अकाऊंट व्हेरिफाय केलं जाणार असल्याचं सांगितलं आहे.