Realme Neo 7 सिरीजमधील दोन स्मार्टफोनची एंट्री, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ढासू कॅमेरा! किंमत केवळ इतकी
स्मार्टफोन कंपनी Realme ने त्यांच्या Realme Neo 7 सिरीजमधील दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये Realme Neo 7 SE आणि Realme Neo 7x यांचा समावेश आहे. दोन्ही स्मार्टफोनची डिझाईन काही प्रमाणात समान आहे. दोन्ही स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. Realme च्या Neo सिरीजमधील Realme Neo 7 SE स्मार्टफोन MediaTek Dimensity 8400-Max चिपसेट आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अगदी कमाल आहेत.
येत्या रविवारी लाँच होणार Xiaomi चा प्रिमियम स्मार्टफोन, 200MP कॅमेरा आणि मिळणार हे खास फीचर्स
चीनमध्ये Realme Neo 7x हा 8GB + 256GB आणि 12GB + 512GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB + 256GB व्हेरिअंटची सुरुवातीची किंंमत CNY 1,299 म्हणजेच 15,600 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,599 म्हणजेच 19,200 रुपये आहे. सध्या हा स्मार्टफोन देशात Realme चायना ई-स्टोअर आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन सिल्व्हर विंग मेचा आणि टायटॅनियम ग्रे स्टॉर्म रंगांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Realme Neo 7 SE स्मार्टफोन 8GB RAM + 256GB, 12GB+256GB, 12GB+512GB आणि 16GB+512GB या 4 व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Realme Neo 7 SE स्मार्टफोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 1,799 म्हणजेच सुमरे 22,000 रुपये, 12GB+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 1,899 म्हणजेच सुमरे 23,000 रुपये, 12GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमरे 26,000 रुपये आणि टॉप व्हेरिअंट 16GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमरे 30,000 रुपये आहे. Realme Neo 7 SE स्मार्टफोन Blue Mecha, Dark Armored Cavalry आणि White Winged God of War रंगात लाँच करण्यात आला आहे.
Realme Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा 1.5K 8T LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 6000 निट्स आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. Realme चा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8400-Max प्रोसेसर आणि 16GB रॅमसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,700mm चौरस VC हीट डिसिपेशन एरिया आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Realme Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX882 कॅमेरा सेंसर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनला (OIS) सपोर्ट करतो. प्रायमरी कॅमेरासह 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी अल्ट्रा अँगल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Realme Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, हा फोन अंड्रॉइड 15 वर आधारित Realme UI 6.0 वर रन करतो.
Realme Neo 7x मध्ये 6.67-इंचाचा फुल HD+ (1,080×2,400 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅम्पलिंग रेट 1,500Hz पर्यंत, पीक ब्राइटनेस 2,000 nits पर्यंत आणि ProXDR सपोर्ट आहे. हा फोन Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसरवर आधारित आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे. हे अँड्रॉयड 15-बेस्ड Realme UI 6.0 सह येते.
Canva down: फोटो – व्हिडीओ एडीटींग अॅप Canva डाऊन! युजर्स वैतागले, मिम्स व्हायरल
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, Realme Neo 7x मध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सेल OV50D40 मुख्य सेन्सर आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 16-मेगापिक्सेल सेन्सर आहे. हा फोन 6,050mm² VC लिक्विड कूलिंग सिस्टम आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्सने सुसज्ज आहे. Realme Neo 7x मध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. या हँडसेटला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP66, IP68 आणि IP69 रेटिंग असल्याचा दावा केला जातो.