Lenovo चा नवीन लॅपटॉप भारतात लाँच, AI फीचर्सने सुसज्ज! तब्बल इतकी आहे किंमत
Lenovo चा नवीन लॅपटॉप Lenovo IdeaPad Slim 5 भारतात लाँच करण्यात आला आहे. AMD Ryzen AI 7 350 प्रोसेसर अपग्रेडसह हा लॅपटॉप हा लाँच झाला आहे. युजर्स लॅपटॉपवर 14 ते 16-इंच डिस्प्ले पर्याय निवडू शकतात, ज्यामध्ये 60Wh बॅटरी आहे. या लॅपटॉपमध्ये मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी असल्याचा दावा केला जातो आणि यामध्ये लेनोवोच्या AI Now आणि लर्निंग झोन सारखे AI-बेस्ड फीचर्स प्री-इंस्टॉल आहेत. हे युजर्सना वर्कफ्लो ऑप्टिमायझेशन, डॉक्यूमेंट समराइजेशन, टेक्स्ट कन्वर्जन इत्यादी वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांमध्ये मदत करतील.
Canva down: फोटो – व्हिडीओ एडीटींग अॅप Canva डाऊन! युजर्स वैतागले, मिम्स व्हायरल
Lenovo IdeaPad Slim 5 (Gen 10) ची भारतात किंमत 91,990 रुपये आहे, ज्यामध्ये 16-इंच 2.8K ओएलईडी डिस्प्ले आणि AMD Ryzen AI 7 350 CPU पर्याय आहे. हा नवीन लॅपटॉप 14-इंच आणि 16-इंच डिस्प्ले ऑप्शन्ससह ऑफर केला जात आहे. नवीन Lenovo IdeaPad Slim 5 (Gen 10) लॅपटॉप कॉस्मिक ब्लू, लुना ग्रे आणि सीफोम ग्रीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा लॅपटॉप सध्या देशात लेनोवो ई-स्टोअर, ई-कॉमर्स वेबसाइट्स तसेच लेनोवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक पर्सनलाइज्ड कॉन्फिगरेशनसाठी Lenovo.com द्वारे कस्टम टू ऑर्डर (CTO) चा लाभ घेऊ शकतात. खरेदीदार लेनोवो प्रीमियम केअरचे फायदे देखील घेऊ शकतात.
Lenovo IdeaPad Slim 5 (Gen 10) ला 14 आणि 16-इंच डिस्प्लेसह कॉन्फिगर केले जाऊ शकते. 16-इंच व्हेरिअंटमध्ये 2.8K OLED स्क्रीन, 100 परसेंट DCI-P3 कलर गॅमट आणि 500 निट्स ब्राइटनेस आहे, तर 14-इंच मॉडेलमध्ये WUXGA OLED डिस्प्ले आहे. दोन्ही मॉडेल्स 120Hz रिफ्रेश रेट देतात.
नवीन आयडियापॅड स्लिम 5 लॅपटॉप Zen 5 कोर, AMD RDNA 3.5 GPU आणि XDNA 2 NPU सह AMD Ryzen AI 7 350 प्रोसेसरने सुसज्ज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो 55 TOPS (ट्रिलियन ऑपरेशन्स पर सेकंड) पर्यंत AI प्रोसेसिंग ऑफर करतो.
लेनोवो AI Now बाबत सांगितलं आहे की, ते Q&A सेशन, वर्कफ्लो ऑप्टिमाइजेशन इत्यादीमध्ये मदतीसाठी आणि पर्सनलाइज्ड AI असिस्टेंससाठी मेटाच्या Llama 3 वर बेस्ड लोकल LLM चा वापर करते. त्याच वेळी, लेनोवो लर्निंग झोन टूलचा वापर व्याख्याने रेकॉर्ड करण्यासाठी, टेक्स्ट कन्वर्ट करण्यासाठी, कागदपत्रांचा सारांश देण्यासाठी आणि क्विझ तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. ही वैशिष्ट्ये निवडक कॉन्फिगरेशनमध्ये प्री-इंस्टॉल्ड केलेली आहेत.
Lenovo IdeaPad Slim 5 (Gen 10) मध्ये क्विक चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्टसह 60Wh बॅटरी देण्यात आली आहे. हे फुल-एचडी आयआर कॅमेरा, टॉफ सेन्सर, प्रायव्हसी शटरने सुसज्ज आहे आणि AI-बेस्ड नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करते. या लॅपटॉपमध्ये मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी असल्याचा दावा केला जातो आणि त्याची जाडी 16.9mm आहे.