
Nubia M153 Leaks: अविश्वसनीय पण खरं! जगातील पहिला स्वतः चालणारा AI फोन! माणसाप्रमाणे फक्त एका क्लिकवर करणार काम
चीनने एक असा स्मार्टफोन तयार केला आहे, जो पूर्णपणे AI वर आधारित आहे. हा स्मार्टफोन व्हॉईस कमांडद्वारे चालतो आणि इतर अनेक काम करू शकतो. जसे स्वत: स्क्रीन वाचून अॅुप ओपन करू शकतो, फॉर्म भरू शकतो, बुकिंग करू शकतो आणि माणसांसारखी इतर अनेक काम अगदी सहज पूर्ण करू शकतो. चीनचे हे इनोवेशन टेक इंडस्ट्रीमध्ये एक मोठी क्रांती असल्याचे मानले जात आहे. हा केवळ एक स्मार्टफोन नसेल तर एक खरा आई-असिस्टेंट देखील असणार आहे, जो स्वत: निर्णय घेणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Another DeepSeek moment. This is the world’s first actual smart phone. It’s an engineering prototype of ZTE’s Nubia M153 running ByteDance’s Doubao AI agent fused into Android at the OS level. It has complete control over the phone. It can see the UI, choose/download apps,… pic.twitter.com/lM9PYMoQek — Taylor Ogan (@TaylorOgan) December 4, 2025
हे अनोखे डिव्हाईस ZTE आणि TikTok ची मालकीन असलेली कंपनी ByDance सह पार्टनरशिप करून तयार करण्यात आले आहे. या डिव्हाईसचे नाव Nubia M153 (Prototype) आहे. तथापी हे डिव्हाईस अजूनही एक प्रोटोटाइप आहे. या फोनचा एक डेमो चीनी बिजनेसमॅन शेंझेनने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे आणि आता या डिव्हाईसची चर्चा संपूर्ण जगभर सुरु झाली आहे. हे डिव्हाईस अँड्रॉयड सिस्टमवर आधारित असणार आहे आणि यामध्ये ByDance चा अॅडव्हांस आई एजेंट Doubao देखील दिला जाणार आहे. याचा वापर चीनमध्ये आधीच लाखो लोकं करत आहेत.
Free Fire MAX: कसा बनला जगभरातील गेमर्सचा आवडता बॅटलरॉयल गेम? रोमांचक इतिहास माहिती आहे का?
जर सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर हा AI डिवाइस कोणत्याही सामान्य व्हॉईस रिकग्निशन सिस्टमवर काम करत नाही. हे एक फुल-स्क्रीन कंट्रोल AI आहे. म्हणजेच हे डिव्हाईस समजू शकते की स्क्रीनवर काय सुरु आहे आणि त्याप्रमाणे डिव्हाईस स्वत:च पुढील पाऊल उचलू शकणार आहे. म्हणजेच हा फोन स्वत:च अॅप निवडू शकणार आहे, फॉर्म भरणार आहे, कॉल करू शकणार आहे, तसेच तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या सुचना देखील वाचू शकणार आहे. याशिवाय हे डिव्हाईस मल्टी-स्टेप टास्क देखील स्वत: पूर्ण करू शकणार आहे आणि गरज असल्यास ते इतर AI बॉट्सशी देखील संवाद साधू शकते. म्हणजेच हा फोन तुमच्या स्मार्टफोनप्रमाणेच काम करणार आहे, पण यामध्ये तुम्हाला डिव्हाईस कंट्रोल करण्यासाठी तुमच्या हातांचा वापर करण्याची गरज नाही.
जर तुम्ही या AI फोनच्या फीचर्सबद्दल ऐकलं तर तुम्ही पूर्णपणे हैराण होणार आहात. जर एखाद्या यूजरने या डिव्हाईसने एखाद्या हॉटेलच्या बाहेरचा फोटो क्लिक केला आणि त्यानंतर आज रात्रीसाठी हॉटेल बुक करा, असं सांगितलं. त्यानंतर, तो फोनने प्रथम फोटोच्या आधारे हॉटेलची ओळख आपोआप करून दिली, नंतर बुकिंग अॅप उघडले, तारखा प्रविष्ट केल्या, दर तपासले आणि हॉटेलमध्ये पाळीव प्राण्यांना परवानगी आहे का ते देखील तपासले. त्यानंतर बुकिंग प्रक्रिया पूर्ण झाली.