Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Microsoft आणि Apple ला टाकलं मागे! Nvidia ने बनवला नवा रेकॉर्ड, इतिहास बदलणार का?

बऱ्याच काळापासून, मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपल जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. काही महिन्यांपूर्वी अ‍ॅपलने मायक्रोसॉफ्टला मागे टाकले होते, परंतु आता एनव्हीडियाने त्या दोघांनाही मागे टाकले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 04, 2025 | 01:42 PM
Microsoft आणि Apple ला टाकलं मागे! Nvidia ने बनवला नवा रेकॉर्ड, इतिहास बदलणार का?

Microsoft आणि Apple ला टाकलं मागे! Nvidia ने बनवला नवा रेकॉर्ड, इतिहास बदलणार का?

Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि व्हॅल्यूबल कंपनी अशी माइक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅपलची ओळख आहे. जगात क्वचितच असा एखादा व्यक्ती पाहायला मिळेल, ज्याला या कंपन्यांबाबत माहिती नाही. मात्र आता या प्रतिष्ठित आणि व्हॅल्यूबल कंपन्यांना Nvidia ने मागे टाकलं आहे. Nvidia चे मार्केट व्हॅल्यू 3.92 ट्रिलियन डॉलर्स झाले आहे. Nvidia ने माइक्रोसॉफ्टच्या 3.7 ट्रिलियन डॉलर आणि अ‍ॅपलच्या 3.19 ट्रिलियन डॉलर या आकड्यांना आता मागे टाकलं आहे. त्यामुळे आात लवकरच इतिहास बदलणार का आणि Nvidia जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि व्हॅल्यूबल कंपनी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

AI चा मास्टर आणि कॅमेरा किंग… Oppo Reno 14 सिरीज अखेर लाँच, जबरदस्त प्रीमियम फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

गुरुवारी (3 जुलै) Nvidia ने 3.92 ट्रिलियन डॉलर्सचे आश्चर्यकारक बाजारमूल्य गाठले आहे आणि इतिहासातील सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे. हा बदल आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर या बदलामागील खरं कारण म्हणजे AI ची जबरदस्त डिमांड. ज्यामध्ये Nvidia ने तांत्रिक प्रभुत्व मिळवले आणि आपली पकड निर्माण केली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Nvidia ची ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट्स (GPUs) हीच ती खास चिप्स आहे, जी AI टूल्स, जसे की, ChatGPT ला ट्रेन करण्यासाठी आणि चालवण्यासाठी वापरली जाते. जसं जसं जगात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मागणी वाढत आहे, त्याच पद्धतीने Nvidia त्याच्या यशाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जात आहे. या वर्षी Nvidia चे शेअर्स 170% पेक्षा जास्त वाढले आहेत आणि गेल्या 12 महिन्यांत त्यांचे मूल्य तिप्पट झाले आहे.

Nvidia च्या अलीकडील निकालांदरम्यान, सीईओ जेन्सेन हुआंग म्हणाले, “एक नवीन औद्योगिक क्रांती सुरू झाली आहे. Nvidia आता पारंपारिक डेटा सेंटर्सना एआय कारखान्यांमध्ये रूपांतरित करण्यास मदत करत आहे, जिथे आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने नवीन उत्पादने उदयास येतील.” वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, कंपनीच्या नवीनतम चिप्सने सर्वात मोठ्या एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांची अतृप्त मागणी वाढली आहे.

Nothing Phone 3 vs Samsung Galaxy S25 vs Google Pixel 9: कोणता प्लॅगशिप स्मार्टफोन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? वाचा स्पेसिफिकेशन्स

मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, मेटा प्लॅटफॉर्म्स, अल्फाबेट (गुगल) आणि टेस्ला सारख्या टेक दिग्गजांमध्ये प्रगत एआय डेटा सेंटर्स बांधण्यासाठी आणि उदयोन्मुख एआय तंत्रज्ञानात आघाडी घेण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे Nvidia च्या विशेष चिप्सची मागणी थेट वाढली आहे.Nvidia, ज्यांनी त्यांचे मुख्य तंत्रज्ञान सुरुवातीला व्हिडिओ गेमसाठी विकसित केले होते, गेल्या चार वर्षांत त्याचे शेअर बाजार मूल्य जवळजवळ आठ पटीने वाढले आहे, जे 2021 मध्ये 500 अब्ज डॉलर्सवरून जवळजवळ 4 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले आहे.

Web Title: Nvidia sets new record leaves apple and microsoft behind to become first company in history to achieve this milestone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 01:42 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा
1

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
2

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…
3

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत…

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
4

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.