AI चा मास्टर आणि कॅमेरा किंग... Oppo Reno 14 सिरीज अखेर लाँच, जबरदस्त प्रीमियम फीचर्सने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
Oppo ने नवीन स्मार्टफोन सिरीज Oppo Reno 14 लाँच केली आहे. या सिरीजमध्ये Oppo Reno 14 आणि Oppo Reno 14 Pro हे दोन्ही स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट लाइनअपमध्ये ऑल न्यू डिझाईन, दमदार परफॉर्मंस, मोठी बॅटरी आणि कमाल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक मोठे अपग्रेड देण्यात आले आहेत. दोन्ही फोन सारख्या डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. मात्र यामध्ये फीचर्स वेगळे आहेत.
चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाल, AI टूलवर…
भारतात Oppo Reno 14 चा बेस व्हेरिअंट 8GB रॅम+ 256GB ची किंमत 37,999 रुपये आणि 12GB रॅम+ 256GB व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर Reno 14 Pro च्या 12GB रॅम + 256GB व्हेरिअंटची किंमत 49,999 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 54,999 रुपये आहे. दोन्ही डिव्हाईस 8 जुलैपासून अॅमेझॉन, विजय सेल्स आणि दूसऱ्या प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Introducing the #OPPOReno14Series in all its stunning shades.
✨ Pearl White – effortlessly elegant across both models
🌫️ Titanium Grey – made exclusively for the Reno14 Pro
🌿 Forest Green – bold and refreshing on the Reno14#AIPortraitCamera #TravelWithReno pic.twitter.com/dlcXTXCLUL— OPPO India (@OPPOIndia) July 3, 2025
या स्मार्टफोनची डिझाईन चीनमध्ये लाँच झालेल्या स्मार्टफोनसारखी आहे. रेनो 14 मध्ये 6.59-इंचाचा फ्लॅट OLED डिस्प्ले आणि प्रो व्हेरिअंटमध्ये 6.83-इंच पॅनल देण्यात आला आहे. दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतात. दोन्ही डिव्हाईस सूर्यप्रकाशातही खूप चांगल्या प्रकारे दिसतील कारण कंपनीचा दावा आहे की या डिव्हाईसला 1,200nits एचबीएम ब्राइटनेस देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या सुरक्षिततेसाठी, कंपनीने त्यात त्यांच्या इन-हाऊस क्रिस्टल शील्ड ग्लासचा वापर केला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये तुम्हाला स्प्लॅश टच आणि ग्लोव्ह मोड देखील मिळेल.
रेनो 14 मध्ये मीडियाटेक 8350 चिपसेट देण्यात आला आहे. प्रो मॉडलमध्ये पावरफुल मीडियाटेक 8450 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे.
ओप्पोने त्यांच्या रेनो 14 सीरीजमध्ये कमालचे AI-पावर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. जबरदस्त फोटो आणि व्हिडीओ क्वालिटीसाठी AI परफेक्ट शॉट, AI स्टाइल ट्रांसफर, AI एडिटर 2.0 आणि AI रीकंपोजसारखे अनेक टूल्स यामध्ये देण्यात आले आहेत. यासोबतच डिव्हाईसमध्ये AI लाईव्ह फोटो 2.0 आणि व्हॉईस एन्हांसर देखील मिळणार आहे. ज्यामुळे कॉल किंवा रिकॉर्डिंगदरम्यान ऑडियो क्लियर ऐकू येणार आहे.
रेनो 14 प्रोमध्ये प्रीमियम कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये चार 50-मेगापिक्सल कॅमेरा आहे. डिव्हाईस OIS सपोर्टसह 50MP OV50E प्रायमरी कॅमेरा, 3.5x ऑप्टिकल झूमसह 50MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड शूटर आणि पोर्ट्रेट किंवा एक्स्ट्रा डेप्थसाठी 50MP OV50D सेंसर देखील आहे.
या 23 नव्या शहरांत सुरु झाली Vi ची 5G सर्विस, एक क्लिकवर वाचा प्रीपेड प्लॅन्सची किंमत
रेगुलर रेनो 14 मध्ये OIS सह 50MP Sony IMX882 प्रायमरी सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी दोन्ही डिव्हाईसमध्ये 50MP JN5 फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. रेनो 14 मध्ये 80W फास्ट वायर्ड चार्जिंगसह 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.